मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया(IND vs AUS) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना २२ नोव्हेंबरला पर्थच्या ऑप्टस स्टेडियममध्ये खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार हा सामना सकाळी ७.५० वाजता सुरू होईल. पहिल्या कसोटीसाठी अंपायर्सच्या नावांची घोषणा झाली आहे.
इंग्लंडचे रिचर्ड कॅटलबोरो आणि न्यूझीलंडचे क्रिस गॅफनी या सामन्यात अंपायरची भूमिका निभावतील. रिचार्ज कॅटलबोरो यांनी या सामन्यात अंपायरिंग करणे भारतीय चाहत्यांसाठी चिंतेची बाब आहे. मोठ्या सामन्यांमध्ये रिचर्ड कॅटलबोरो यांनी अंपायरिंग केले असताना भारताने अनेक सामने गमावले आहेत. गेल्या वर्षी वनडे वर्ल्डकपच्या फायनलमध्ये कॅटलबोरो यांनी मैदानी अंपायरिंगची भूमिका निभावली होती.
Champions Trophy: भारताने चीनला हरवत रचला इतिहास, १-०ने जिंकली ट्रॉफी
न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्डकप सेमीफायनल आणि टी-२० वर्ल्डकप सामन्यात कॅटलबोरो अंपायर होते. गेल्या वर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्येही रिचर्ड यांनी थर्ड अंपायरची भूमिका निभावली होती. यासोबतच २०१४च्या वर्षी टी-२० वर्ल्डकप, २०१५ वनडे वर्ल्डकप, २०१६ टी-२० वर्ल्डकप, चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७च्या नॉकआऊट सामन्यातही कॅटलबोरो अंपायर होते.
५१ वर्षीय कॅटलबोरो अंपायर बनण्याआधी क्रिकेटही खेळले आहेत. कॅटलबोरो यांनी ३३ फर्स्ट क्लास आणि २१ लिस्ट ए सामन्यांत एकूण १४४८ धावा केल्या होत्या.