Tuesday, February 11, 2025
Homeक्रीडाChampions Trophy: भारताने चीनला हरवत रचला इतिहास, १-०ने जिंकली ट्रॉफी

Champions Trophy: भारताने चीनला हरवत रचला इतिहास, १-०ने जिंकली ट्रॉफी

मुंबई: भारताने महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२४च्या(Champions Trophy) फायनलमध्ये चीनला हरवत खिताब जिंकला आहे. ही आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील तिसरी वेळ आहे जेव्हा भारतीय संघाने हा खिताब जिंकला आहे. सामन्याचा एकमेव गोल भारताकडून दीपिकाने ३१व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरद्वारे केला. बिहारच्या राजगीर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये फायनल सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती.

भारत आणि चीन यांच्यात खेळवण्यात आलेला फायनल सामन्याच्या पहिल्या दोन क्वार्टरमध्ये एकही गोल होऊ शकला नाही. म्हणजेच हाफ टाईमपर्यंत एकही गोल झाला नाही. मात्र तिसरा क्वार्टर सुरू होण्याच्या पहिल्या मिनिटांतच भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. दीपिकाने या पेनल्टी कॉर्नरचे रूपांतर गोलमध्ये केले आणि पहिल्याच प्रोजेक्टमध्ये टीम इंडियाला चॅम्पियन बनवले. चीनने शेवटच्या मिनिटापर्यंत गोल करण्यासाठी अथक प्रयत्न केले मात्र त्यांचे प्रयत्न सपशेल अपयशी ठरले.

भारत तिसऱ्यांदा बनला चॅम्पियन

भारताने याआधी दोन वेळा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचा(Champions Trophy)खिताब जिंकला आहे. २०१६मध्ये टीम इंडियाने चीनला रोमहर्षक सामन्यात २-१ असे हरवले होते. तर २०२३मध्ये भारतीय संघाने जपानला ४-० असे हरवले होते. गेल्या पाच स्पर्धेत भारताने हा खिताब तिसऱ्यांदा जिंकला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -