
मुंबई : अदानी उद्योग समूहावर (Adani Group) अमेरिकेत कथित लाच दिल्याचा तसेच फसवणूक (Bribery Case) केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अमेरिकेत झालेल्या या आरोपांनंतर आदानी उद्योग समूहाच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स गडगडले (Shares Fall) आहेत. यातील ४ कंपन्यांना तर थेट लोअर सर्किट लागले आहे. दरम्यान, अमेरिकेत करण्यात आलेले सर्व आरोप अदानी उद्योग समूहाने फेटाळले आहेत.

नवी दिल्ली : हिंडेनबर्ग रिसर्च रिपोर्टमुळे अडचणीतून सावरलेला अदानी समूह (Adani Group) पुन्हा गोत्यात आला आहे. आज शेअर उघडताच सर्व स्टॉक धडाधड कोसळल्याचे (Stock Fall) ...
अदानी समूहाने अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ जस्टिस आणि यूएस सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनने केलेले आरोप फेटाळले आहेत. अदानी ग्रीनच्या संचालकांवर केलेले आरोप निराधार असल्याचे अदानी उद्योग समूहाने म्हटले आहे. अभियोगातील आरोप हे आरोप आहेत आणि प्रतिवादी दोषी सिद्ध होईपर्यंत निर्दोष मानले जात असल्याचे अदानी समूहाने म्हटले आहे. आम्ही सर्व ते शक्य कायदेशीर मार्ग शोधू असे अदानी उद्योग समूहाने म्हटले आहे. आमच्या उद्योग समूहात प्रशासनात नेमहीच उच्च दर्जा राखला जातो. तसेच पारदर्शकता, कायद्याचे पालन, सर्वोच्च मानकांचे पालन केले जाते. आम्ही त्यासाठी प्रतिबद्ध आहोत. आम्ही कायद्याचे पालन करणारे आहोत, असं आम्ही आमच्या स्टेकहोल्डर्स, पार्टनर्स तसेच कर्मचाऱ्यांना आश्वस्त करतो. आम्ही सर्व कायद्यांचे पालन करतो, असेही अदानी उद्योग समूहाच्या प्रवक्त्यांनी सांगितले.
भारतातील सर्वांत मोठा सौरउर्जी निर्मिती प्रकल्पाचे कंत्राट मिळावे यासाठी गौतम अदानी आणि त्यांचा पुतण्या सागर अदानी यांनी भारतीय अधिकाऱ्यांना सुमारे २५० दशलक्ष डॉलर्स देण्याचे मान्य केले होते. या प्रकल्पातून पुढच्या २० वर्षांत साधारण २ अब्ज डॉलर्सचा नफा मिळणार होता. तसेच कर्जदार आणि गुंतवणूकदार यांच्यापासून हा भ्रष्टाचार लपवून गौतम अदानी आणि अदानी ग्रीन एनर्जीचे सीईओ विनीत जैन यांनी ३ अब्ज डॉलर्स किमतिचे बॉण्ड्स आणि रोखे जमा केले होते, असाही आरोप करण्यात आला आहे. (Adani Group)