Donald Trump : अमेरिकेवर तब्बल इतक्या कोटींचे कर्ज

वॉशिंग्टन: सध्या अमेरिकेवर ३६ ट्रिलियन डॉलर्सचे कर्ज आहे, जे प्रत्येक नागरिकासाठी सुमारे १ लाख डॉलर्स (८४ लाख रुपये) आहे. गेल्या चार महिन्यांत हे कर्ज एक ट्रिलियन डॉलरने वाढले असून, दरवर्षी एक ट्रिलियन डॉलर्स व्याजाचा बोजा अमेरिकी अर्थव्यवस्थेवर येतो.


डोनाल्ड ट्रम्प(Donald Trump) यांना दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपद मिळाल्यानंतर त्यांच्यासमोर हे कर्ज संकट मोठे आव्हान ठरणार आहे. २०२१ मध्ये जो बिडेन सत्तेवर आल्यावर कर्ज २६.९ ट्रिलियन डॉलर होते, ते त्यांच्या कार्यकाळात ९ ट्रिलियन डॉलरने वाढले. परंतु, यापूर्वीही सरकारच्या अनियंत्रित खर्चामुळेच हा कर्जाचा डोंगर निर्माण झाला आहे.


अमेरिकेतील संरक्षण, सामाजिक सुरक्षा, मेडिकेअर, शिक्षण, व पायाभूत सुविधा यावर प्रचंड खर्च होतो. तसेच, वित्तीय तूट वाढल्यामुळे सरकारला कर्ज घ्यावे लागते. ट्रम्प यांच्या आधीच्या कार्यकाळातही कर्ज १९ ट्रिलियन डॉलर्सवरून २७ ट्रिलियन डॉलर्सवर गेले होते. त्यामुळे ट्रम्प यांच्यासाठी ही समस्या नवनिर्मित नसली, तरी ती सोडवणे कठीण आहे.


अमेरिकन सरकारला कर्जफेडीसाठी जास्त कर आकारावा लागू शकतो, त्यामुळे नागरिकांवरील आर्थिक ताण वाढेल. त्याशिवाय, डोनाल्ड ट्रम्प यांनी बेकायदेशीर स्थलांतरितांना हद्दपार करण्याचे आश्वासन दिले होते. हे अंमलात आणण्यासाठी अब्जावधी डॉलर्स खर्च होईल, त्यामुळे कर्ज संकट अधिक गंभीर होईल.


कर्ज नियंत्रणासाठी नवीन सरकारला ८ ट्रिलियन डॉलर्सच्या खर्चात कपात करावी लागणार आहे. तसेच देशाला तूट कमी करण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्या लागतील. ट्रम्प(Donald Trump) यांची आर्थिक धोरणे कर्ज कमी करण्यासाठी कितपत यशस्वी ठरतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Comments
Add Comment

शेरी सिंगने घडवला इतिहास; बनली भारताची पहिली 'मिसेस युनिव्हर्स'

नवी दिल्ली : भारतासाठी २०२५ हे वर्ष ऐतिहासिक वर्ष आहे यात काही वाद नाही . ऑगस्टच्या "मिस युनिव्हर्स" या स्पर्धेनंतर

ट्रम्प यांना मोठा झटका! 'ही' महिला ठरली शांततेच्या नोबेल पुरस्काराची मानकरी!

ओस्लो : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार (Nobel Peace Prize) मिळेल अशी खूप मोठी

फिलिपाइन्समध्ये भूकंपाचा जोरदार धक्का; ७.६ रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद, त्सुनामीचा इशारा

मिंडानाओ, फिलिपाइन्स: फिलिपाइन्सच्या मिंडानाओ बेटाजवळ शुक्रवारी ( पहाटे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले.

Afghan Foreign Minister Muttaqi India Visit : अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री भारतात! संबंध दृढ करण्यावर दोन्ही देशांचा भर

नवी दिल्ली/काबूल : अफगाणिस्तानचे (Afghanistan) परराष्ट्र मंत्री अमीर मुत्ताकी भारत दौऱ्यावर असून नवी दिल्लीत दाखल झाले

सरकारी कामकाजावरील बंदीमुळे ‘नासा’चे कामकाज ठप्प !

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या सरकारी कामकाजावरील बंदीमुळे ‘नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेचे कामकाज सध्या ठप्प झाले

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये भारताने पाकिस्तानला फटकारले!

संयुक्त राष्ट्रे : संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेमध्ये भारताने पाकिस्तानला खडे बोल सुनावले. पाकिस्तानचे वागणे