
एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
मुंबई : विधानसभा निवडणुकीत मुंबईत भाजप-काँग्रेसमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता एक्झिट पोल सर्वेक्षणातून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे. मुंबईच्या एकूण ३६ मतदारसंघातील १० मतदारसंघ हे मुंबई शहरात आणि उर्वरित २६ मतदारसंघ हे मुंबई उपनगरात येतात.
विविध एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे. एसएएस ग्रुपच्या एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडीला मुंबईत १८-१९ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर महायुतीला १७-१८ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. इतरांना मुंबईत १-२ जागा मिळणार असल्याचे म्हटले जात आहे.

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ संपल्यानंतर, आता एक्झिट पोल्स (Exit Poll) येण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान ...
लोकशाही रुद्र एक्झिट पोलच्या अंदाजानुसार मुंबईत भाजपला १२, शिवसेना (शिंदे गट) दोन, राष्ट्रवादी (अजित पवार गट) एक, काँग्रेसला दोन, शिवसेना (ठाकरे गट ) १४, राष्ट्रवादी (शरद पवार गट) एक आणि इतरांना चार जागा मिळण्याचा अंदाज आहे. झीनीया एआय एक्झिट पोलनुसार मुंबईत महायुतीला १५-२०, महाविकास आघाडीला १५-२० आणि इतरांना एक जागा मिळण्याची शक्यता आहे.