Sunday, February 9, 2025
Homeताज्या घडामोडीAssembly Election: मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पुण्याहून येणारी मुले अमरावतीत अडकली

Assembly Election: मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पुण्याहून येणारी मुले अमरावतीत अडकली

नागपूर : विधानसभा निवडणुकीत मतदान करता यावे म्हणून भारतीय जनता पक्षाने पुण्यातीलच नागपूरकर तरुणांसाठी विशेष बसची व्यवस्था केली. ठरल्याप्रमाणे मंगळवारी काही बसेस पुण्याहून नागपूरसाठी निघाल्या. पण आज बुधवारी पहाटेपासून त्या अमरावतीच्या नांदगाव पेठ टोलनाक्यावर अडकून पडलेल्या आहेत.

CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांनी कुटुंबियांसोबत बजावला मतदानाचा हक्क!

विदर्भात रोजगाराचा प्रश्न असल्याने येथील लाखो तरुण रोजगारासाठी पुणे,बंगरूळूला जातात. त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून राजकीय पक्ष त्यांना स्वखर्चाने नागपुरात आणतात आणि पोचवून देतात. लोकसभा निवडणुकीत हा प्रयोग यशस्वी झाला. म्हणून विधानसभा निवडणुकीत तो करण्यात आला. मात्र अमरावतीत बस अडकल्याने मतदार युवक संतापले. टोलच्या पैशावरून वाद झाल्याने हा प्रकार घडल्याचे सांगितले जाते. सकाळी ८ पर्यंत बसेस अमरावतीत अडकून होत्या.ठरल्या वेळेनुसार त्या सकाळी ६ ला नागपुरात येणार होत्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -