
पुणे : राज्यातील अनुदानित, विनाअनुदानित महाविद्यालये, कृषी विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण विभागातर्फे (Higher Education Department) १४ शिष्यवृत्ती योजना (Scholarship Exam) राबवल्या जातात. मात्र, शिष्यवृत्ती योजनांसाठी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये विविध प्रवेशित विद्यार्थ्यांच्या तुलनेत अत्यंत कमी प्रतिसाद मिळाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनांना अर्ज करण्यासाठी मुदतवाढ करण्यात आली आहे.

मुंबई : महाराष्ट्र शासनातर्फे (Maharashtra Government) दरवर्षी सीईटी परीक्षा (CET Exam) घेण्यात येते. यामध्ये इंजिनिअरिंग, फार्मसी, अग्रिकल्चरसह एमबीए, एमसीए, बीसीए, बीएमएस ...
उच्च शिक्षण विभागाच्या पुणे विभागाचे सहसंचालक डॉ. अशोक उबाळे यांनी याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. उच्च शिक्षणाच्या विविध शिष्यवृत्ती योजनांसाठी महाडीबीटी संकेतस्थळाद्वारे (Maha DBT) अर्ज भरावा लागतो. मात्र यंदा प्रवेशित विद्यार्थ्यांच्या तुलनेत अतिशय कमी अर्ज महाडीबीटी संकेतस्थळावर प्राप्त झाल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे २५ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत शिष्यवृत्ती अर्ज सप्ताह राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
विशेष मोहिम उपलब्ध करण्याचे आवाहन
शिष्यवृत्ती योजनांसाठी (Scholarship Exam) अधिकाधिक विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी पुणे उच्च शिक्षण विभागाच्या अखत्यारितील पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यातील शासकीय, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालये, अकृषी विद्यापीठांमध्ये १४ शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज भरण्यासाठी महाविद्यालय, विद्यापीठ स्तरावर संगणक, इंटरनेट सुविधा उपलब्ध करून द्यावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.