मुंबई : महाराष्ट्र शासनातर्फे (Maharashtra Government) दरवर्षी सीईटी परीक्षा (CET Exam) घेण्यात येते. यामध्ये इंजिनिअरिंग, फार्मसी, अग्रिकल्चरसह एमबीए, एमसीए, बीसीए, बीएमएस बीबीए यासारख्या अभ्यासक्रमांसाठी घेत असलेल्या प्रवेश परीक्षा (Entrance Exam) घेण्यात येतात. सीईटी सेलने (CET Cell) आगामी शैक्षणिक सत्राची सुरुवात केली असून याबाबतचा अभ्यासक्रम जाहीर केला आहे. मात्र यंदा अभ्यासक्रमात काहीसा बदल (CET Exam Syllabus) करण्यात आला आहे.
Typing Exam : गैरप्रकार टाळण्यासाठी संगणक टंकलेखन परिक्षेच्या वेळापत्रकात बदल!
मिळालेल्या माहितीनुसार, २०२५-२६ सत्रात बीबीए-बीसीए अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाठीच्या प्रश्नसंख्येत बदल करण्यात आला आहे. ४० प्रश्नांच्या पेपरमध्ये ३० व ३० प्रश्न असणाऱ्या पेपरमध्ये ४० प्रश्न असणार आहेत. तसेच लॉजिकल रिझनिंग, अस्ट्रॅक्ट रिझनिंग, क्वाण्टिटेटिव्ह अ टिट्यूड आणि व्हर्बल अबिलिटी या चार विषयांवर २०० गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे.
दरम्यान, ही परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड एमसीक्यू पध्दतीने होणार असून यामध्ये निगेटिव्ह मार्किंग राहणार नाहीत. तसेच गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन शास्त्र विषयांसाठी जाहीर केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना तयारीसाठी मुबलक वेळ उपलब्ध होणार आहे, असे सीईटी कक्षाने म्हटले आहे. (CET Exam Syllabus)