Russia : युक्रेनविरोधात आण्विक शस्त्रे वापरण्यास परवानगी, पुतिन यांनी केला धोरणात बदल

मॉस्को: रशिया-युक्रेन युद्ध आणखी तीव्र होत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनला रशियाविरूद्ध लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र वापरण्याची परवानगी दिली होती. त्यामुळे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रशियन सैन्याला युक्रेनविरोधात आण्विक शस्त्रे वापरण्याची परवानगी दिली आहे.


या धोरणात महत्त्वाचा बदल केला आहे, त्यात असे ठरवले गेले आहे की, जर कोणत्याही देशाने अणुशक्तीच्या सहाय्याने रशियावर क्षेपणास्त्र हल्ला केला तर रशिया आण्विक शस्त्रांचा वापर करेल. अमेरिकेने युक्रेनला आर्मी टॅक्टिकल मिसाइल सिस्टम (ATACMS) वापरण्यास परवानगी दिली असून, ही प्रणाली ३०० किमीपर्यंत अचूक हल्ला करू शकते. अमेरिकेने ऑक्टोबर २०२३ मध्ये युक्रेनला ATACMS क्षेपणास्त्र दिली होती परंतु त्यावर मर्यादा होती. आता या अटी काढून टाकल्याने युक्रेन अधिक आक्रमक होऊ शकते. फ्रान्सने देखील युक्रेनला स्टॉर्म शॅडो क्षेपणास्त्र दिली होती. परंतु ती सुध्दा मर्यादित वापरासाठी होती. या बदलामुळे रशियाने आपले आण्विक धोरण कडक केले आहे.त्यामुळे जागतिक पातळीवर चिंता निर्माण झाली आहे.


पुतिन यांनी म्हटले की युक्रेन या क्षेपणास्त्रांचा उपयोग अमेरिकेच्या तांत्रिक सहाय्याशिवाय करू शकत नाही. नाटोचे प्रशिक्षित जवानच ही शस्त्रे प्रभावीपणे वापरू शकतात. त्यामुळे नाटो प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे युद्धात सामील होत असल्याचा इशारा पुतिन यांनी दिला आहे. या सर्व घटनांमुळे युद्ध आणखी तीव्र होण्याची आणि जागतिक शांततेला धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Comments
Add Comment

सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी गूगल तयार; बनवले खास डूडल

सर्वत्र नववर्षाची चाहूल लागली आहे. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेकजण पार्टीचे आयोजन

पुतिन यांच्या घरावरील हल्ल्यानंतर रशियाकडून घातक ‘ओरेशनिक’ क्षेपणास्त्र तैनात

मास्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या अधिकृत निवासस्थानी ड्रोन हल्ला झाल्यानंतर रशियाने

बांग्लादेशमध्ये दीपू दासनंतर तिसऱ्या हिंदूची गोळ्या झाडून निर्घृण हत्या

ढाका : बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांविरोधातील हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असून, मैमनसिंग जिल्ह्यात

Khaleda Zia Death : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन

खालिदा झिया यांनी केवळ राजकारणच नव्हे, तर 'स्टाईल स्टेटमेंट'मधूनही गाजवलं सत्तेचं रणांगण! साधेपणा, काळा चष्मा

बांगलादेशात हिंदूंवर ईशनिंदेशी संबंधित ७१ हल्ले

एकसारखाच पॅटर्न - आधी सोशल मीडियावर आरोप, नंतर जमावाचा हिंदू वस्त्यांवर हल्ला ढाका : बांगलादेशात हिंदू

इंडोनेशियात भीषण दुर्घटना

जकार्ता : इंडोनेशियात एक दुर्दैवी घटना घडली आहे. रविवारी (२८ डिसेंबर) संध्याकाळी एका रिटायरमेंट होमला भीषण आग