
नागपूर: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात कुटुंबासह मतदनाचा हक्क बजावला. नागपुरातील धरमपेठ येथील मतदारसंघात देवेंद्र फडणवीस त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि आई सविता फडणवीस यांच्यासह मतदान केले. यावेळी त्यांनी निवडणुकीत महायुतीला विजय मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मतदान केल्यानंतर संवाद साधताना फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रातील जनतेला आव्हान आहे की सर्वांनी मतदान करावे.

नागपूर : विधानसभा निवडणुकीत मतदान करता यावे म्हणून भारतीय जनता पक्षाने पुण्यातीलच नागपूरकर तरुणांसाठी विशेष बसची व्यवस्था केली. ठरल्याप्रमाणे ...
लोकशाहीत सरकारकडून आपण अपेक्षा ठेवतो, त्या अपेक्षा ठेवत असताना जो मतदान करतो त्याला जास्त अपेक्षा
ठेवण्याचा अधिकार आहे. आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वांनी मतदान करावे. तसेच लोकसभेत ज्या याद्यांमध्ये घोळ होता, तो काही प्रमाणात दूर झालेला आहे. वोटिंग सिस्टीम लोकसभेत स्लो होती त्याच्यात आता इम्प्रूमेंट झाले आहे. त्यामुळे निश्चित टक्का वाढेल. असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या सर्व २८८ जागांसाठी मतदान सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. तर संध्याकाळी ६ वाजता ही निवडणुकीची सांगता होत मतदारांचा अंतिम कौल मतपेटीत कैद होणार आहे आहे. तर २३ नोव्हेंबर रोजी
मतमोजणी नंतर राज्याच्या सत्तेच्या सिंहासनावर कोण विराजमान होणार हे चित्र स्पष्ट होणार आहे.