मुंबई: राज्यात आत विधानसभेसाठी मतदान होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येलाच भाजपकडून सुप्रिया सुळे(supriya sule) तसेच नाना पटोले यांच्यावर आरोपबाजी करण्यात आली आहे. पुण्याचे माजी पोलीस अधिकारी रवींद्र विकास यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर परकीय चलन वापरणे तसेच आर्थिक व्यवहारांसाठी बिटकॉईनचा(Bitcoin) वापर केल्याचा आरोप केला आहे.
भाजपचे खासदार तसेच प्रवक्ते सुंधाशू त्रिवेदी यांनी मंगळवारी रात्री ही पत्रकार परिषद घेतली होती. यादरम्यान हे आरोप करण्यात आले. तसेच त्यांनी पुरावे म्हणून कॉल रेकॉर्ड्स आणि व्हॉट्सअॅप चॅटचे स्क्रीनशॉटही सादर केले. भाजपने मंगळवारी पत्रकार परिषद घेत पटोले आणि सुळे यांच्यावर आरोपबाजी केली. सुप्रिया सुळे आणि पटोले यांनी परकीय चलनाचा वापर करत मतदानावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचेही म्हणाले.
Voter List: असे शोधा घरात बसून मतदार यादीतील तुमचे नाव, मतदानासाठी ही ओळखपत्रे गरजेची
दरम्यान, भाजपने केलेले हे आरोप सुप्रिया सुळे यांनी फेटाळून लावले आहेत. तसेच केलेल्या आरोपाविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे सुळे म्हणाल्या.