Monday, February 10, 2025
Homeताज्या घडामोडीVoter List: असे शोधा घरात बसून मतदार यादीतील तुमचे नाव, मतदानासाठी ही...

Voter List: असे शोधा घरात बसून मतदार यादीतील तुमचे नाव, मतदानासाठी ही ओळखपत्रे गरजेची

मुंबई: लोकशाहीचा उत्सव म्हणजे निवडणूक असते. राज्यात लोकशाहीच्या उत्सवाला सुरूवात झाली आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला राज्यभरात सुरूवात झाली आहे. यंदा एकाच टप्प्यात राज्यात मतदान होत आहे. दरम्यान, अनेकदा काही कारणांमुळे मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता येत नाही. अनेकदा मतदार यादीत(Voter List) नाव आहे की नाही याची शोधाशोध करावी लागते. यामुळे मतदान केंद्रावर गेल्यावर खूप गोंधळ होतो.

हा गोंधळ होऊ नये यासाठी घरबसल्या तुम्ही तुमचे नाव मतदार यादीत पाहू शकता. तसेच तुमच्याकडे मतदान ओळखपत्र नसले तरीही तुम्ही इतर ओळखपत्रांचा वापर करून मतदान करू शकता.

असे शोधा मतदार यादीत नाव

निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईट http://www.eci.gov.inवर लॉग इन करा.

वेबसाईट उघडल्यानंतर होमपेजवर जाऊन डाव्या बाजूला तुम्हाला search your name in voter list हा पर्याय निवडा

त्यावर क्लिक केल्यावर तुमचे राज्य निवडा.

त्यानंतर पेज ओपन झाल्यावर तेथे तुमचा EPIC नंबर टाका.

विचारलेला कॅप्चा भरा.

जर तुमचे मतदार यादीत नाव असेल तर संपूर्ण माहिती स्क्रीनवर दिसेल.

या ओळखपत्रानेही करू शकता मतदान

तुमच्याकडे जर मतदान करण्यासाठी मतदार ओळखपत्र नसेल तरी काही टेन्शन घेण्याची गरज नाही. तुम्ही छायाचित्रासह पासबुक, कामगार मंत्रालयाकडून वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड,ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट, निवृत्तीवेतनाचे कागदपत्रे, केंद्र अथवा राज्य शासन तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले ओळखपत्र, संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना दिलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना दिलेले विशेष ओळखपत्र मतदानासाठी वापरता येईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -