Wednesday, May 14, 2025

महाराष्ट्रमहत्वाची बातमी

Assembly election: राज्यात २८८ विधानसभा जागांसाठी मतदानाला सुरूवात, झारखंडमध्येही दुसऱ्या टप्प्यात मतदान

Assembly election: राज्यात २८८ विधानसभा जागांसाठी मतदानाला सुरूवात, झारखंडमध्येही दुसऱ्या टप्प्यात मतदान

मुंबई: महाराष्ट्रात विधानसभेच्या(Assembly election) २८८ जागांसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यातील अनेक दिग्गज नेते जसे शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दुसरीकडे झारखंडमध्येही दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे. येथे सामना सत्तारूढ असलेल्या इंडिया ब्लॉक आणि एनडीए यांच्यात आहे. झारखंडमध्ये आज एकूण ८१ विधानसभेच्या जागांपैकी ३८वर मतदान होत आहे. निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबरला जाहीर होईल.



मोहन भागवत, राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांचे मतदान


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी नागपूरमध्ये मतदान केंद्रावर जात मतदान केले. तर राज्याचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी कुलाबा विधानसभा क्षेत्रातील मुंबईच्या राजभवन स्थित केंद्रावर आपले मतदान केले. येथून भाजपाकडून राहुल नार्वेकर यांना मैदानात उतरवण्यात आले आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसने हीरा देवासी यांना उतरवले आहे.


 


राज्यात सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यातील २८८ जागांसाठी एकाच वेळी मतदान होत आहे. विधानसभेच्या २८८ जागांवर अपक्षांसह विविध पक्षांचे एकूण चार हजार १३६ उमेदवार रिंगणात आहेत. राज्यातील ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार या उमेदवारांच्या भाग्याचा फैसला करणार आहेत.



मुंबईकर निवडणार ३६ आमदार


मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघांतील एकूण ४२० उमेदवारांमधून आपले ३६ आमदार निवडण्यासाठी आज बुधवारी शहर आणि उपनगरातील एक कोटी दोन लाख २९ हजार ७०८ मतदारांना लोकशाहीच्या उत्सवात सुवर्णसंधी चालून आलेली असताना १० हजार ११७ मतदान केंद्रांवर मतदार राजाचे स्वागत करण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.



२०१९ची निवडणूक


गेल्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती झाली होती. तेव्हा भाजपने १०५, तर शिवसेनेने ५६ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला ४४ तर राष्ट्रवादीला ५४ जागा मिळाल्या होत्या. भाजप-शिवसेना सहज सत्तेवर येऊ शकले असते, पण मुख्यमंत्रिपदावरुन युती तुटली.



झारखंडमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात


झारखंड विधानसभेच्या(Assembly election)  दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे. या टप्प्यात मुख्यमंत्री हेमंत सोरेन, पत्नी कल्पना सोरेन, विरोधीपक्ष नेते अमर कुमार बाऊरी याशिवाय ५००हून अधिक उमेदवारांच्या नशिबाचा फैसला होणार आहे. १४,२१८ मतदान केंद्रांवर सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. संध्याकाळी ५ वाजेपर्यंतं मतदान सुरू राहील.

Comments
Add Comment