मुंबई : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी (Assembly Election 2024) आज सकाळी ७ ते ६ या वेळेत सर्वसाधारणपणे काही तुरळक अपवाद वगळता शांततेत मतदान झाले. सायंकाळी सहा वाजेपर्यंत ६५.११ टक्के मतदान झाले. गेल्या वेळी राज्यात ६१.४० टक्के मतदान झाले होते. तर आता येत्या शनिवारी, २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असून त्यात राज्याचा कारभारी कोण होणार? हे स्पष्ट होईल.
दरम्यान, महायुतीने महिला, वयोवृद्ध यांसह समाजातील विविध घटकांसाठी लागू केलेल्या योजनांवर मतदार राजा किती खुश आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे विरोधकांकडून विविध मुद्यांवर आरोप करून राज्य सरकारचे वाभाडे काढण्यात आले, याचाही मतदार कसा कौल देतो, हेही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
३० वर्षांमधील सर्वाधिक मतदान
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात सायंकाळी ६ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ६५.११ टक्के मतदान झालं आहे. गेल्या ३० वर्षांमध्ये पहिल्यांदाच राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याचं पाहायला मिळालं आहे. १९९५ साली ७१.६९ टक्के मतदानाची नोंद झाली होती. अलीकडच्या काही वर्षांमध्ये राज्यात कधीच ६५ टक्क्यांहून अधिक मतदान झालं नव्हतं. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ६१.३९ टक्के मतदानाची नोंद झाली होती. तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ६१.४ टक्के मतदान झालं होतं. मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा ३.७ टक्के मतदान वाढलं आहे. ही मतदानाची वाढलेली आकडेवारी निवडणुकीच्या निकालात महत्त्वाची भूमिका बजावू शकते.
मतदानाचं प्रमाण वाढवण्याच्या प्रयत्नांना अपयश
मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर या चार मोठ्या शहरांमध्ये मतदानाचं प्रमाण वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने विशेष प्रयत्न केले होते. मात्र त्याला फारसे यश आले नसल्याचे पाहायला मिळाले. राज्यात सर्वाधिक ८२ टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील कागल मतदारसंघात झाल आहे. तेथे वैद्याकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादीचे (शरद पवार) समरजितसिंह घाटगे यांच्यातच चुरशीची लढत होत आहे. सर्वात कमी ४१ टक्के मतदान हे कल्याण पश्चिम मतदारसंघात झालं आहे. मंत्रालय व विधानभवन ही सत्तेची प्रमुख केंद्रे असलेल्या कुलाबा मतदारसंघांत टक्केवारी वाढवण्यासाठी बरेच प्रयत्न झाले असले तरी तिथे ४५ टक्केच मतदान झाले आहे.
सायंकाळी ६ वाजेपर्यंत झालेले मतदान
- अहमदनगर – ७१.७३ टक्के
- अकोला – ६४.९८ टक्के
- अमरावती – ६५.५७ टक्के
- औरंगाबाद- ६८.८९ टक्के
- बीड – ६७.७९ टक्के
- भंडारा – ६९.४२ टक्के
- बुलढाणा – ७०.३२ टक्के
- चंद्रपूर- ७१.२७ टक्के
- धुळे – ६४.७० टक्के
- गडचिरोली – ७३.६८ टक्के
- गोंदिया – ६९.५३ टक्के
- हिंगोली – ७१.१० टक्के
- जळगाव – ६४.४२ टक्के
- जालना – ७२.३० टक्के
- कोल्हापूर – ७६.२५ टक्के
- लातूर – ६६.९२ टक्के
- मुंबई शहर- ५२.०७ टक्के
- मुंबई उपनगर -५५.७७ टक्के
- नागपूर – ६०.४९ टक्के
- नांदेड – ६४.९२ टक्के
- नंदुरबार- ६९.१५ टक्के
- नाशिक – ६७.५७ टक्के
- उस्मानाबाद – ६४.२७ टक्के
- पालघर – ६५.९५ टक्के
- परभणी – ७०.३८ टक्के
- पुणे – ६१.०५ टक्के
- रायगड – ६७.२३ टक्के
- रत्नागिरी – ६४.५५ टक्के
- सांगली – ७१.८९ टक्के
- सातारा – ७१.७१ टक्के
- सिंधुदुर्ग – ६८.४० टक्के
- सोलापूर – ६७.३६ टक्के
- ठाणे – ५६.०५ टक्के
- वर्धा – ६८.३० टक्के
- वाशिम – ६६.०१ टक्के
- यवतमाळ – ६९.०२ टक्के मतदान झाले.
सायंकाळी ५ वाजेपर्यंत झालेले मतदान
- अहमदनगर – ६१.९५ टक्के
- अकोला -५६.१६ टक्के
- अमरावती – ५८.४८ टक्के
- औरंगाबाद – ६०.८३ टक्के
- बीड – ६०.६२ टक्के
- भंडारा – ६५.८८ टक्के
- बुलढाणा – ६२.८४ टक्के
- चंद्रपूर – ६४.४८ टक्के
- धुळे – ५९.७५ टक्के
- गडचिरोली – ६९.६३ टक्के
- गोंदिया – ६५.०९ टक्के
- हिंगोली – ६१.१८ टक्के
- जळगाव – ५४.६९ टक्के
- जालना – ६४.१७ टक्के
- कोल्हापूर – ६७.९७ टक्के
- लातूर – ६१.४३ टक्के
- मुंबई शहर – ४९.०७ टक्के
- मुंबई उपनगर – ५१.७६ टक्के
- नागपूर – ५६.०६ टक्के
- नांदेड- ५५.८८ टक्के
- नंदुरबार- ६३.७२ टक्के
- नाशिक – ५९.८५ टक्के
- उस्मानाबाद – ५८.५९ टक्के
- पालघर- ५९.३१ टक्के
- परभणी – ६२.७३ टक्के
- पुणे – ५४.०९ टक्के
- रायगड – ६१.०१ टक्के
- रत्नागिरी – ६०.३५ टक्के
- सांगली – ६३.२८ टक्के
- सातारा – ६४.१६ टक्के
- सिंधुदुर्ग – ६२.०६ टक्के
- सोलापूर – ५७.०९ टक्के
- ठाणे – ४९.७६ टक्के
- वर्धा – ६३.५० टक्के
- वाशिम – ५७.४२ टक्के
- यवतमाळ – ६१.२२ टक्के मतदान झाले आहे.
दुपारी ३ वाजेपर्यंत झालेले मतदान
- अहमदनगर – ४७.८५ टक्के
- अकोला – ४४.४५ टक्के
- अमरावती -४५.१३ टक्के
- औरंगाबाद – ४७.०५ टक्के
- बीड – ४६.१५ टक्के
- भंडारा – ५१.३२ टक्के
- बुलढाणा – ४७.४८ टक्के
- चंद्रपूर – ४९.८७ टक्के
- धुळे – ४७.६२ टक्के
- गडचिरोली – ६२.९९ टक्के
- गोंदिया – ५३.८८ टक्के
- हिंगोली – ४९.६४टक्के
- जळगाव – ४०.६२ टक्के
- जालना – ५०.१४ टक्के
- कोल्हापूर – ५४.०६ टक्के
- लातूर – ४८.३४ टक्के
- मुंबई शहर- ३९.३४ टक्के
- मुंबई उपनगर-४०.८९ टक्के
- नागपूर – ४४.४५ टक्के
- नांदेड- ४२.८७ टक्के
- नंदुरबार- ५१.१६ टक्के
- नाशिक – ४६.८६ टक्के
- उस्मानाबाद – ४५.८१ टक्के
- पालघर- ४६.८२ टक्के
- परभणी – ४८.८४ टक्के
- पुणे – ४१.७० टक्के
- रायगड – ४८.१३ टक्के
- रत्नागिरी – ५०.०४टक्के
- सांगली – ४८.३९ टक्के
- सातारा – ४९.८२टक्के
- सिंधुदुर्ग – ५१.०५ टक्के
- सोालपूर – ४३.४९ टक्के
- ठाणे – ३८.९४ टक्के
- वर्धा – ४९.६८ टक्के
- वाशिम -४३.६७ टक्के
- यवतमाळ – ४८.८१ टक्के मतदान झाले आहे.
दुपारी १ वाजेपर्यंत झालेले मतदान
- अहमदनगर – ३२.९० टक्के
- अकोला – २९.८७ टक्के
- अमरावती – ३१.३२ टक्के
- औरंगाबाद – ३३.८९ टक्के
- बीड – ३२.५८ टक्के
- भंडारा- ३५.०६ टक्के
- बुलढाणा- ३२.९१ टक्के
- चंद्रपूर- ३५.५४ टक्के
- धुळे – ३४.०५ टक्के
- गडचिरोली-५०.८९ टक्के
- गोंदिया – ४०.४६ टक्के
- हिंगोली -३५.९७ टक्के
- जळगाव – २७.८८ टक्के
- जालना- ३६.४२ टक्के
- कोल्हापूर- ३८.५६ टक्के
- लातूर – ३३.२७ टक्के
- मुंबई शहर- २७.७३ टक्के
- मुंबई उपनगर- ३०.४३ टक्के
- नागपूर – ३१.६५ टक्के
- नांदेड – २८.१५ टक्के
- नंदुरबार- ३७.४० टक्के
- नाशिक – ३२.३० टक्के
- उस्मानाबाद- ३१.७५ टक्के
- पालघर-३३.४० टक्के
- परभणी-३३.१२टक्के
- पुणे – २९.०३ टक्के
- रायगड – ३४.८४ टक्के
- रत्नागिरी-३८.५२ टक्के
- सांगली – ३३.५० टक्के
- सातारा -३४.७८ टक्के
- सिंधुदुर्ग – ३८.३४ टक्के
- सोलापूर – २९.४४
- ठाणेे – २८.३५ टक्के
- वर्धा – ३४.५५ टक्के
- वाशिम – २९.३१ टक्के
- यवतमाळ – ३४.१० टक्के
Assembly Election 2024 : बुथवर शुकशुकाट, उमेदवारांमध्ये घबराट!
सकाळी ९ वाजेपर्यंत झालेले मतदान
- अहमदनगर – १८.२४ टक्के
- अकोला – १६.३५ टक्के
- अमरावती – १७.४५ टक्के
- औरंगाबाद- १८.९८ टक्के
- बीड – १७.४१ टक्के
- भंडारा – १९.४४ टक्के
- बुलढाणा – १९.२३ टक्के
- चंद्रपूर – २१.५० टक्के
- धुळे – २०.११ टक्के
- गडचिरोली -३० टक्के
- गोंदिया – २३.३२ टक्के
- हिंगोली -१९.२० टक्के
- जळगाव – १५.६२ टक्के
- जालना – २१.२९ टक्के
- कोल्हापूर- २०.५९ टक्के
- लातूर १८.५५ टक्के
- मुंबई शहर- १५.७८ टक्के
- मुंबई उपनगर- १७.९९ टक्के
- नागपूर – १८.९० टक्के
- नांदेड – १३.६७ टक्के
- नंदुरबार- २१.६० टक्के
- नाशिक – १८.७१ टक्के
- उस्मानाबाद- १७.०७ टक्के
- पालघर-१९ .४० टक्के
- परभणी-१८.४९ टक्के
- पुणे – १५.६४ टक्के
- रायगड – २०.४० टक्के
- रत्नागिरी-२२.९३ टक्के
- सांगली – १८.५५ टक्के
- सातारा -१८.७२ टक्के
- सिंधुदुर्ग – २०.९१ टक्के
- सोलापूर – १५.६४
- ठाणे१६.६३ टक्के
- वर्धा – १८.८६ टक्के
- वाशिम – १६.२२ टक्के
- यवतमाळ -१६.३८ टक्के