Sunday, February 9, 2025
Homeताज्या घडामोडीAssembly Election 2024 : बुथवर शुकशुकाट, उमेदवारांमध्ये घबराट!

Assembly Election 2024 : बुथवर शुकशुकाट, उमेदवारांमध्ये घबराट!

सकाळच्या सत्रात मतदारांचा निरुत्साह

मुंबई : मुंबईसह राज्यात (Maharashtra Election) बहुतेक ठिकाणी मतदानाला (Assembly Election Voting) फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे सकाळच्या सत्रात दिसून आले. निवडणूक आयोग आणि विविध संस्थांमार्फत आवाहन करुन देखिल मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचे चित्र सर्वत्र दिसते आहे.

राज्याच्या विकासावर गांभीर्याने चर्चा न करता दलबदलू नेते आणि प्रचारादरम्यान एकमेकांविरोधात केलेल्या चिखलफेकीमुळे मतदार काहीसे नाराज झाले असल्याचे दिसून येते.

दरम्यान, प्रत्येक विभागात सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते मतदारांना मतदान (Voting) करण्यासाठी आवाहन करत असल्याचे दिसून आले. सकाळच्या सत्रात महिला वर्ग घरच्या कामामध्ये, स्वयंपाक करण्यात गुंतलेला असतो. त्यामुळे दुपारनंतर ख-या अर्थाने बुथवर चांगल्या प्रकारे मतदान होईल, असे सांगण्यात आले. (Assembly Election 2024)

सकाळच्या सत्रात झालेले मतदान

९ वाजेपर्यंत राज्यात ६.६१ टक्के मतदान झाले 

  • अहमदनगर – ५.९१ टक्के
  • अकोला – ६.० टक्के
  • अमरावती -६.६ टक्के
  • औरंगाबाद-७.५ टक्के
  • बीड -६.८८ टक्के
  • भंडारा- ६.२१ टक्के
  • बुलढाणा- ६.१६ टक्के
  • चंद्रपूर-८.५ टक्के
  • धुळे -६.७९ टक्के
  • गडचिरोली-१२.३३ टक्के
  • गोंदिया -७.९४ टक्के
  • हिंगोली -६.४५ टक्के
  • जळगाव – ५.८५ टक्के
  • जालना- ७.५१ टक्के
  • कोल्हापूर-७.३८ टक्के
  • लातूर ५.९१ टक्के
  • मुंबई शहर-६.२५ टक्के
  • मुंबई उपनगर-७.८८ टक्के
  • नागपूर -६.८६ टक्के
  • नांदेड -५.४२ टक्के
  • नंदुरबार-७.७६ टक्के
  • नाशिक – ६.८९ टक्के
  • उस्मानाबाद- ४.८५ टक्के
  • पालघर-७.३० टक्के
  • परभणी-६.५९ टक्के
  • पुणे – ५.५३ टक्के
  • रायगड – ७.५५ टक्के
  • रत्नागिरी-९.३० टक्के
  • सांगली – ६.१४ टक्के
  • सातारा – ५.१४ टक्के
  • सिंधुदुर्ग – ८.६१ टक्के
  • सोलापूर – ५.७,ठाणे ६.६६ टक्के
  • वर्धा – ५.९३ टक्के
  • वाशिम – ५.३३ टक्के
  • यवतमाळ – ७.१७ टक्के

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -