मुंबई : सध्या लग्नाचे दिवस (Wedding Season) सुरु असून सर्वत्र सोनं चांदीची खरेदी करण्यासाठी मोठी लगबग सुरु असल्याचे दिसून येते. मागील आठवड्यात सोन्याच्या दरात घट झाली होती. त्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळत होता. मात्र आता पुन्हा सोनं-चांदीचे दर वधारले आहेत. (Gold Silver Price Hike)
सोमवारच्या तुलनेत मंगळवारी सोन्याच्या दरात १० ग्रॅममागे १० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यानुसार आज २४ कॅरेट सोन्याचा दर ७६ हजार ४०० रुपये आणि २२ कॅरेट सोन्याचा भाव ७० हजार रुपयांवर पोहोचला आहे.
Gold-Silver Rate Today : सोनं १५ दिवसांत ६ हजार रुपयांनी स्वस्त तर चांदीचे दरही घसरले!
इतर शहरात सोन्याचे भाव काय? (Gold Rate Today)
मुंबई आणि पुणे शहरात २२ कॅरेट सोन्याचे दर ६९ हजार ९६० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचे दर ७६ हजार ३२० रुपये आहे.
नवी दिल्ली, लखनऊ आनि जयपूर येथे २२ कॅरेट सोन्याचे दर ७० हजार ११० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचे दर ७६ हजार ४७० रुपये आहे.
चांदीची किंमत काय? (Silver Rate Today)
आजच्या दिवशी एक किलो चांदीचा दर ८९ हजार ४०० रुपये आहे. तर दिल्लीच्या सराफा बाजारात चांदीचे दर १ हजार ८१० रुपयांनी वाढून ९२ हजार रुपये प्रति किलो झाला आहे.