Nitin Gadkari : काय सांगता खरंच... आता फक्त १७ मिनिटात पोहोचा नवी मुंबई विमानतळावर!

मुंबई : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) देशातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल घडवून आणणार आहेत. आता मुंबई ते नवी मुंबई विमानतळ (Navi Mumbai Airport) फक्त आणि फक्त १७ मिनिटांत गाठता येणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रस्तावित वॉटर टॅक्सी (Water Taxi) सेवेमुळे लोकांना मुंबईतील कुठूनही १७ मिनिटांत पोहोचता येईल. त्यामुळे प्रवासाचा वेळ कमी होईल असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.



रविवारी रात्री महाराष्ट्राच्या ठाणे शहरात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी एका निवडणूक सभेला संबोधित करत असताना त्यांनी हे वक्तव्य केले. मुंबई आणि ठाणे दरम्यान कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या योजनांबद्दलही त्यांनी माहिती दिली.



बस १७ मिनिटे लागतील


मुंबईत विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election 2024) २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. मार्च २०२५ मध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होण्याची अपेक्षा आहे. नितीन गडकरी म्हणाले की, प्रवाशांना प्रस्तावित वॉटर टॅक्सी सेवा सुरू झाल्यानंतर मुंबईच्या कोणत्याही भागातून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचण्यासाठी फक्त १७ मिनिटे लागतील. विमानतळाजवळ या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी एक 'जेट्टी' आधीच बांधण्यात आली आहे असेही गडकरी म्हणाले. विशाल समुद्र किनारा मुंबई आणि ठाणे परिसराला लाभला आहे. या समुद्राचा जल वाहतुकीसाठी वापर करुन रस्त्यावरील गर्दी आणि प्रदूषण कमी करता येणार आहे. मुंबई-दिल्ली एक्स्प्रेस हायवे पूर्ण झाल्यावर मुंबई-पुणे महामार्गावरील गर्दी कमी होणार असल्याचे गडकरी यांनी म्हटले.


महाराष्ट्रमध्ये सर्व मोठी उद्योग येत आहेत. संभाजी नगरमध्ये २० हजार कोटींची गुंतवणूकहोत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांकडून राज्य आणि प्रशासन कसे असावे आणि ते कसे चालवावे शिकण्यासारखे आहे. परंतु काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांमुळे गेल्या ६० वर्षांत देशाचा विकास झाला नाही, अशी टीका नितीन गडकरी यांनी काँग्रेसवर केली.



रस्ते बांधण्यासाठी करणार कचऱ्याचा वापर


अटल सेतू जवळून १४ पदरी रस्ता तयार केला जाणार आहे. हा रस्ता मुंबईहून बेंगळुरूला जाणार असून पुण्यातील रिंग रोड मार्गे हा रस्ता तयार केला जाईल. या रस्त्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक ५० टक्क्यांनी कमी होईल. तसेच येत्या २५ वर्षांत सर्व वाहने विजेवर चालतील. तसेच आपण रस्ते बांधण्यासाठी कचऱ्याचा देखील वापर करू शकतो, असेही त्यांनी म्हटले. (Nitin Gadkari)

Comments
Add Comment

नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन; दिल्ली-एनसीआरला मिळाले दुसरे आंतरराष्ट्रीय प्रवेशद्वार

नवी दिल्ली : देशाच्या विमान वाहतूक क्षेत्रात मोठी झेप घेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील जेवर

ई-गव्हर्नन्स सुधारणांमध्ये मंत्री नितेश राणेंच्या ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’चा डंक

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदीप पी. यांनी स्वीकारले प्रशस्तिपत्र  मुंबई : प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक,

मुंबईत ३४० झाडांचा गुदमरलेला श्वास झाला मोकळा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेकडून सन २०२५ मध्ये तब्बल ३४० वृक्षांभोवतीचे काँक्रिट काढण्यात आले

समुद्रात जाणारा कचरा रोखण्यासाठी आवश्यक त्याठिकाणी ‘ट्रॅश बूम’

मुंबई : ट्रॅश बूममुळे नदी, नाले आणि समुद्रात तरंगणारा कचरा अडवला जातो. प्रामुख्याने नाल्यांच्या तोंडावर लावल्या

नालेसफाईच्या कामाला गती, मिठी नदीच्या सफाईला रविवारपासून होणार सुरुवात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे या तीनही विभागांमध्ये नाल्‍यातून गाळ

देशात इंधनाचा तुटवडा नाही, तरीही पंतप्रधान मोदींची स्ट्रॅटर्जी तयार

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; अफवा पसरवणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई मुंबई : जागतिक स्तरावर इंधनाचे मोठे संकट उभे