Saturday, October 25, 2025
Happy Diwali

Karnataka Encounter : २० वर्षांनंतर वॉन्टेड नक्षलवादी गोळीबारात ठार!

Karnataka Encounter : २० वर्षांनंतर वॉन्टेड नक्षलवादी गोळीबारात ठार!

बेंगळूरु : कर्नाटमकधील (Karnataka Encounter) पश्चिम घाट परिसरात आज नक्षलविरोधी दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये एका नक्षलवादी नेत्याचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. विक्रम गौडा (Vikram Gawda) असे मृत नेत्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटक पोलीस (Karnataka Police) गेल्या २० वर्षांपासून दक्षिण भारतातील मोस्ट वॉन्टेड माओवादी नेत्यापैकी एक विक्रम गौडाचा शोध घेत होते आणि प्रत्येक वेळी तो पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलिसांनी त्याला अनेकवेळा शोधूनही कारवाई केली, तरीही त्याला पकडता आले नाही. अखेर पोलिसांच्या कारवाईत त्यांचा मृत्यू झाला आहे, असे राज्याचे गृहमंत्री जी.परमेश्वरा (G. Parmeshwara) यांनी सांगितले.

दरम्यान, त्याच्यासोबत असलेले विक्रम गौडा यांचे इतर तीन साथीदार मात्र पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्यात यशस्वी झाले. अधिकाऱ्यांनी प्रदेशात कोम्बिंग ऑपरेशन सुरू ठेवले आहे.

Comments
Add Comment