मुंबई : एनसीपी नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्यावर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीकडून (Lawrence Bishnoi Gang) गोळीबार करण्यात आला होता. तसेच लॉरेन्स बिश्नोईकडून सातत्याने सलमान खानला (Salman Khan) देखील जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) आतापर्यंत २५ आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यानंतर या प्रकरणातील फरार आरोपी लॉरेन्स बिश्र्नोईच्या भावाला देखील अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खानला धमकी आणि बाबा सिद्दिकीच्या हत्ये प्रकरणातील आरोपी अनमोल बिश्नोई (Anmol Bishnoi) फरार होताच त्याच्या प्रत्यार्पणासाठी मुंबई पोलिसांनी अमेरिकेला प्रस्ताव पाठवला होता. त्यानुसार काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी अनमोल बिश्नोई अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात असल्याचे सांगितले. त्यांनतर माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांनी धडक कारवाई करत लॉरेन्स बिश्र्नोईच्या भावाला अटक करण्यात आली आहे. तसेच त्याला लवकरच भारतात आणले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, एजन्सीने २०२२ च्या दोन प्रकरणांमध्ये बिष्णोई विरुद्ध आरोपपत्र दाखल केलं होतं. यामध्ये २०२२ साली पंजाबचा गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येचाही समावेश असून याच्यावर अनमोल बिश्नोईवर (Anmol Bishnoi) १८ पेक्षाही अधिक गुन्हे नोंद आहेत.