Monday, February 17, 2025
Homeताज्या घडामोडीTyping Exam : गैरप्रकार टाळण्यासाठी संगणक टंकलेखन परिक्षेच्या वेळापत्रकात बदल!

Typing Exam : गैरप्रकार टाळण्यासाठी संगणक टंकलेखन परिक्षेच्या वेळापत्रकात बदल!

१ डिसेंबरऐवजी ‘या’ तारखेला होणार परीक्षा

अलिबाग : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे (Maharashtra State Examination Council) घेण्यात येणाऱ्या संगणक टंकलेखन परिक्षेच्या (Typing Exam) वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. पूर्वीच्या वेळापत्रकानुसार या परीक्षा येत्या १ डिसेंबर ते १५ डिसेंबर य कालावधीत घेण्यात येणार होत्या. मात्र, आता या परीक्षा ९ डिसेंबरपासून सुरू होणार असल्याची माहिती परीक्षा परिषदेने दिली.

संगणक टंकलेखन परीक्षेसाठी राज्यभरातून एक लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. परिक्षा परिषदेने मॅन्युअल टायपिंग’ आणि लघुलेखन परीक्षेसाठीचे वेळापत्रक अद्याप जाहीर केलेले नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांत अधिकृत वेळापत्रक प्रसिद्ध केले जाण्याची शक्यता आहे.

CBSC Syllabus : दहावी-बारावीचा अभ्यासक्रम १५ टक्क्यांनी कमी!

गेल्या काही वर्षांत मॅन्युअल टायपिंग परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे, तर संगणक टंकलेखन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. परिक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी परीक्षा परिषदेकडून अनेक बदलही करण्यात आले आहेत. परिषदेतर्फे जुनमध्ये घेण्यात आलेल्या टंकलेखन, लघुलेखन परीक्षांमध्ये अनेक तांत्रिक अडचणी आल्या होत्या. त्यामुळे वेळापत्रकात बदल करावा लागला होता. आता डिसेंबरमध्ये होणाऱ्या परीक्षांमध्ये तांत्रिक अडचणी येऊ नयेत यासाठी परिषदेकडून खबरदारी घेतली जाईल, असे परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -