मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या (Assembly election 2024) प्रचाराच्या तोफा आज संध्याकाळी थंडावल्या. बुधवारी राज्यभरातील २८८ जागांवर मतदान होत आहे, त्याआधी ४८ तास म्हणजेच, आज संध्याकाळी सहा वाजेपर्यत प्रचार करण्याची संधी उमेदवारांना होती. या प्रचाराच्या काळात महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या झंझावती सभा झाल्या. यात राष्ट्रवादी शरद पवार गटातील नेते जयंत पाटलांनी ६१ सभा गाजवल्या. प्रचार करणाऱ्या नेत्यांमध्ये सर्वाधिक सभा भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्या. त्यांनी राज्य पिंजून काढत संपूर्ण राज्यभरात ६४ सभा घेतल्या.
प्रचाराच्या अखेरच्या दिवशी अजित पवार, शरद पवार, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या सभा झाल्या. विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा आज अखेरचा दिवस होता. सोमवार संध्याकाळपासून छुप्या पद्धतीने करण्यात येणाऱ्या प्रचारास सुरुवात झालीय. या प्रचारात उमेदवार कार्यकर्ते आणि मतदारांच्या गाठीभेटी घेतील. दरम्यान महिनाभरापासून राज्यात सर्वच उमेदवारांनी आणि पक्षांनी मैदानात उतरून जोरदार प्रचार केला. रॅली, सभा, घोंगडी बैठका, कोपरा सभा, बाइक रॅली, घरोघरी भेटी, गावभेटींसह राज्यात प्रचाराचा धुरळा उडाला होता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांवर निशाणा शेतकऱ्यांना ४५ हजार कोटी दिले, सोयाबीन-कापूस उत्पादकांचा प्रश्न सोडवला; धारावीकरांना २ लाख घरे ...
बारामतीमध्ये शरद पवार आणि अजित पवार, वरळीमध्ये आदित्य ठाकरे, वांद्रे पूर्वमध्ये उद्धव ठाकरे, मुंबादेवीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासंह राजकारणातील दिग्गजांच्या सभांसह प्रचाराच्या तोफा थंडावल्याचे दिसून आले. कुठे सभा घेण्यात आल्या. तर कुठे बाईक रॅली आणि पदयात्रा काढण्यात आल्या. अनेक नेत्यांनी आपल्या होमग्राऊंडवर सभा गाजवल्या. सोमवारी सायंकाळी सहा वाजता प्रचाराचा शेवट झाला असून आता बुधवारी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. महाराष्ट्राच्या सत्तेची चावी कुणाच्या हाती याचा निर्णय २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. नियमानुसार आता प्रचार संपला असून यापुढे दोन दिवस छुपा प्रचार सुरू राहणार आहे.
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. आता उमेदवारांकडे छुप्या प्रचारासाठी अवघे काही तास राहिले आहेत. दरम्यान आज लालबाग मेघवाडी ...
राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक होत असून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. लोकसभेमध्ये बसलेल्या फटक्यानंतर सावध झालेल्या महायुतीने वेगळी रणनीती आखल्याचं दिसून आलं. तर दुसरीकडे आत्मविश्वास वाढलेल्या महायुतीनेही जोरदार दणक्यात प्रचार केला. आता २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबर रोजी निकाल समोर येणार आहे.
मुख्यमंत्र्यांची मुंबादेवीत शेवटची सभामुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या मुंबादेवीतील उमेदवार शायना एनसी यांच्यासाठी शेवटची सभा घेतली. शायना एनसी या मूळच्या भाजपच्या असून मुंबादेवी हा मतदारसंघ शिवसेनेला सुटल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासाठी सांगता सभा घेतली.
बारामतीत पवार काका-पुतण्याची सभा
परंपरेप्रमाणे शरद पवार यांनी त्यांची शेवटची सभा (Assembly election 2024) बारामतीमध्ये घेतली. त्यांच्या पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्यासाठी शरद पवार यांनी सांगता सभा घेतली. तर दुसरीकडे अजित पवारांनीही त्यांची सांगता सभा बारामतीमध्ये घेतल्याचं दिसून आलं. बारामतीमध्ये यंदा काका-पुतण्यामध्ये लढत असून अजित पवार आणि शरद पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचं दिसून आलं.






