Saturday, February 8, 2025
Homeब्रेकिंग न्यूजPM Modi Nigeria Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले नायजेरियातील मराठी समुदायाचे...

PM Modi Nigeria Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले नायजेरियातील मराठी समुदायाचे कौतुक

नायजेरिया : नायजेरियातील मराठी भाषिक त्यांच्या संस्कृतीशी आणि मुळांशी एकरुप आहेत, या शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषिकांचे कौतुक केले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल नायजेरियातील मराठी भाषिकांना आनंद झाल्याचेही पंतप्रधान म्हणाले. एक्स वर एका पोस्टमधे मोदी यांनी लिहीले आहे. “मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल, नायजेरियात, मराठी भाषिकांनी आनंद व्यक्त केला. ते त्यांच्या संस्कृती आणि मुळांशी ज्या पद्धतीने जोडले गेले आहेत, ते पाहणे अतिशय कौतुकास्पद आहे.”

Devendra Fadanvis : “त्या एका पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली”, फडणवीसांचा मोठा खुलासा

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवस नायजेरियाच्या दौऱ्यावर आहेत. मराठी भाषिकांनी मोदी नायजेरियात पोहोचताच त्यांचे जोरदार स्वागत केलं. तसेच त्यांना पत्र देऊन मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. भारत सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार खूप मानतो. मराठी भाषिकांसाठी हा निर्णय अत्यंत अभिमानास्पद आहे. मराठी साहित्य आणि संस्कृतीला या निर्णयामुळे प्रोत्साहन मिळेल. असं त्यांनी या पत्रात लिहिलं आहे.

यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलताना, मी नायजेरिया सरकार आणि नायजेरियाच्या जनतेचे मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच हा सन्मान मी १४० कोटी भारतीयांना आणि भारत आणि नायजेरिया यांच्यातील घनिष्ठ मैत्रीला समर्पित करतो. हा पुरस्कार आम्हाला दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी पुढे घेऊन जाण्यासाठी प्रेरणा देत राहील, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदी यांनी दिली.

 

 

 

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -