Financial planning : हे ७ सूत्र लक्षात ठेवा! पैसा इतका वाढेल की, लोक विचारायला येतील-तुम्ही हे कसे केले?

मुंबई : जर तुम्ही तुमच्या पगाराचा किंवा मिळणा-या उत्पन्नाचा योग्य वापर करत नसाल आणि आर्थिक नियोजनाकडे (Financial planning) दुर्लक्ष करत असाल तर ही चूक तुम्हाला महागात पडू शकते. पैशाची कमतरता तुमच्या आयुष्यात कधीही समस्या निर्माण करू शकते.



योग्य आर्थिक नियोजन करणे हे रॉकेट सायन्स नाही, तर तुम्ही ते योग्य वेळी सुरू केले पाहिजे. पण जर तुम्ही तुमच्या करिअरच्या सुरुवातीला हे करायला विसरलात तरी काही हरकत नाही, अजूनही संधी आहे... चला, ती ७ सोपी सूत्रे जाणून घेऊया, जी केवळ बचतीद्वारेच नव्हे तर तुमचे उत्पन्न अनेक पटींनी वाढविण्यात मदत करतील. या टिप्सचा अवलंब केल्यावर लोक स्वतः येऊन विचारतील, "भाई, तुम्ही हे कसे केले? तुम्ही इतके पैसे कसे वाढवले?"



आधी बचत, मग खर्च!


पगार आला की आधी बचत करा. त्याचा नियम बनवा. फक्त तुमची बचत जमा करू नका, गुंतवणूक करा, जेणेकरून तुमचे पैसे वाढतील.



तुमचे पैसे योग्य ठिकाणी ठेवा!


५०% खर्चासाठी, ३०% बचतीसाठी आणि २०% मजा आणि सहलीसाठी. आर्थिक बजेट सांभाळण्याचा हा सर्वोत्तम फॉर्म्युला आहे.



कार खरेदी करायची आहे का? हे जाणून घ्या!


२०% डाउन पेमेंट, कर्जाचा ४ वर्षांचा कालावधी आणि पगाराच्या १०% पेक्षा जास्त रक्कम ईएमआयकडे जाऊ नये, याची काळजी घ्या. कार खरेदी करणे शक्यतो टाळा. त्याऐवजी योग्य ठिकाणी गुंतवणूक करा, पैसा वाढेल.



प्रियजनांसाठी संरक्षणात्मक कवच


तुमच्या पगाराच्या १० पट आयुर्विमा आणि वैद्यकीय विमा घ्या. हे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आर्थिक ताणापासून वाचवेल.




 

कर्जात बुडणे टाळा!


मासिक हप्ता हा पगाराच्या ३०% पर्यंत असावा. गृहकर्जाचा कालावधी कमी ठेवा म्हणजे कमी व्याज भरावे लागेल.


तुमची सर्व अंडी एका टोपलीत ठेवू नका


जर तुम्ही इक्विटी आणि म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असाल तर २०-३०% पेक्षा जास्त गुंतवणूक करू नका. तुमची गुंतवणूक वेगवेगळ्या ठिकाणी विभागून करा.


अडचणीसाठी पैसे तयार ठेवा


दर महिन्याला ३-५% पगार आपत्कालीन निधीत टाका. (Financial planning) संकटकाळात याचा उपयोग होईल.

Comments
Add Comment

सौदी अरेबियाचा मोठा निर्णय! मद्यप्राशनास परवानगी

कडक नियमात शिथिलता सौदी अरेबिया : सौदी अरेबियातील कायदे शरिया (इस्लामिक धार्मिक कायदा)वर आधारित आहेत.

श्रीलंका टी-२० मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर

मुंबई : वर्ल्ड चॅम्पियन भारतीय संघ अखेरीस मोठ्या विश्रांतीनंतर मैदानावर उतरणार आहे. महिला एकदिवसीय विश्वचषक

महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

मुंबई : राज्यासह देशातील वातावरणात सातत्याने बदला होताना दिसत आहे. डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा गेला असूनही

भारताचे द. आफ्रिकेसमोर १७६धावांचे लक्ष्य, हार्दिक पांड्याचे धमाकेदार अर्धशतक

कटक (वृत्तसंस्था) : कटकच्या मैदानात सध्या हार्दिक पांड्याच्या बॅटने आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली.

विठुनामाच्या जयघोषाने मुंबापुरी दुमदुमणार

मुंबई : वारकरी संप्रदायाच्या वैचारिक ऐश्वर्याचे दर्शन मुंबईकरांना घडावे यासाठी गेली २६ वर्ष सुरू असणारा

थ्री इडियट्सचा सिक्वेल २०२६ मध्ये येणार, सिनेप्रेमींची वाढली उत्सुकता

मुंबई : तब्बल १५ वर्षांनंतर बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि आयकॉनिक चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘थ्री