Gujrat: MBBSच्या सीनिअर विद्यार्थ्यांनी केलेल्या रॅगिंगमुळे १८ वर्षीय विद्यार्थ्याला गमवावा लागला जीव

गुजरात : गुजरातमधील पाटण जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पाटण जिल्ह्यातील धारपूर येथील जीएमईआरएस वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या वसतिगृहात शनिवारी रात्री 'एमबीबीएस'च्या १८ वर्षीय विद्यार्थ्यांचा रॅगिंगदरम्यान तीन तास उभे केल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. महाविद्यालयाने या घटनेचा तपास सुरू केला आहे. रॅगिंगप्रकरणात जे वरिष्ठ विद्यार्थी दोषी आढळतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.


सीनिअर विद्यार्थ्यांनी केलेल्या रॅगिंगदरम्यान तीन तास उभे राहिल्याने अनिल मेथानिया नावाचा विद्यार्थी बेशुद्ध पडला आणि त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. हार्दिक शहा यांनी दिली. विद्यार्थी कोसळल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वाचवण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले आणि त्याला मृत घोषित करण्यात आले.



मेडिकलच्या प्रथम वर्षाच्या एका विद्यार्थ्यांने सांगितले की, सात-आठ सीनिअर विद्याथ्यांनी ज्युनिअर गटाला सुमारे तीन तास उभे राहण्यास भाग पाडले आणि एक-एक करून आपली ओळख करून दिली. 'त्यांनी आम्हाला उभे राहायला भाग पाडले आणि आम्हाला चिडचिड करू नका असे सांगितले.आम्ही सगळे ३ तास उभे होतो त्यावेळी आमच्यासोबत उभा असलेला एक विद्यार्थी बेशुद्ध पडला.


महाविद्यालय आणि सरकारकडून न्याय मिळेल, अशी अपेक्षा अनिलचा चुलत भाऊ धर्मेंद्र मेथानिया याने पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

Comments
Add Comment

महिलेने अंतर्वस्त्रात लपवले लाखोंचे सोने! दिल्ली विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर

नवी दिल्ली: दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विमानतळावरील

अरे बापरे! देशभरात २२ बनावट विद्यापीठे

यूजीसीकडून देशातील २२ बनावट विद्यापीठांची यादी जाहीर नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) देशातील २२ बनावट

फक्त ६ वर्षांच्या मुलांनाच पहिलीत प्रवेश

दिल्ली सरकारने पहिलीच्या प्रवेशासाठी वयोमर्यादा केली निश्चित नवी दिल्ली  : दिल्ली सरकारने शालेय शिक्षणात एक

अयोध्येतील राम मंदिरावर पंतप्रधान मोदी फडकवणार धर्म ध्वज

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत प्रमुख पाहुणे अयोध्या  : अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर होणाऱ्या

न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे पुढील सरन्यायाधीश! चार दशकांहून अधिक अनुभव असणारे न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या कार्याबद्दल सविस्तर जाणून घ्या...

नवी दिल्ली: देशाचे विद्यमान सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सरन्यायाधीश हा पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही

राम मंदिराच्या दर्शनाची वेळ बदलली , जाणून घ्या अयोध्यातील दर्शनाची वेळ...

अयोध्या : अयोध्येतील श्रीराम मंदिर म्हणजे श्रद्धा आणि भक्तीचा अनोखा संगम. दिवसेंदिवस प्रभू रामाचे दर्शन