Monday, May 12, 2025

मजेत मस्त तंदुरुस्तताज्या घडामोडी

Turmeric Water: सकाळी रिकाम्या पोटी हळदीचे पाणी पिणे फायदेशीर आहे का?

Turmeric Water: सकाळी रिकाम्या पोटी हळदीचे पाणी पिणे फायदेशीर आहे का?

मुंबई: हळदीचा वापर अनेक शतकांपासून आरोग्यासाठी केला जातो. हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. यात अँटी इन्फ्लामेंटरी आणि अँटी ऑक्सिडंट गुण असतात. यामुळे शरीराची सूज कमी होते. हळदीमधील अँटीऑक्सिडंट गुण आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. चांगले आरोग्य प्राप्त करणयासाठी रिकाम्या पोटी हळदीचे पाणी(Turmeric Water) पिण्याचा प्रयत्न करा. जाणून घ्या याचे काय फायदे होतात.



हळदीचे पाणी पिण्याचे फायदे


इम्युनिटी वाढते - हळदीचा वापर अनेक शतकांपासून रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी केला जातो. यात अनेक अँटीऑक्सिडंट असतात जे शरीराला फ्री रॅडिकल्सपासून होणाऱ्या नुकसानापासून बचाव करतात. याशिवाय दर दिवशी हळदीचे पाणी पित असाल तर रोगप्रतिकारक क्षमता कमी होणार नाही. यामुळे आरोग्य स्वस्थ राखताना संक्रमणाशी लढण्यास मदत मिळेल.


पाचनशक्ती सुधारते- हळदीचे पाणी नियमितपणे प्यायल्यास पचनसंस्था सुधारते. तसेच गॅसची समस्या कमी होते. याशिवाय यात अँटी इन्फ्लामेंटरी गुण आढळतात. यामुळे पाचन सुधारते.


ब्लड शुगर कमी होते - दर दिवशी रिकाम्या पोटी हळदीचे पाणी प्यायल्याने ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित राहते. मधुमेहांच्या रुग्णासाठी हे फायदेशीर आहे.


हृदयरोगाची जोखीम कमी होते - हळदीचे पाणी(Turmeric Water) नियमित प्यायल्याने हृदयरोगाची जोखीम कमी होते.

Comments
Add Comment