ठाणे: विधानसभा सार्वत्रिक निवडणुका २०२४ साठी जिल्ह्यातील अठरा विधानसभा मतदारसंघात येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६.०० या वेळेत मतदान होणार आहे. या मतदानासाठी जिल्ह्यातील मतदान केंद्रे सुसज्ज करण्यात आली आहेत. मतदान प्रक्रिया सुखद व सुलभ व्हावी, यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी मतदान केंद्रांचे संचालन महिला अधिकारी व कर्मचारी करणार आहेत. महिला शक्तीच्या माध्यमातून या मतदान केंद्राचे कामकाज चालणार आहे.
ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडून मोठ्या प्रमाणात मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.
PM Modi : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा प्रत्येक माणसापर्यंत पोहोचला पाहिजे
सखी मतदान केंद्रे:
१३४ भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघ – मतदान केंद्र क्र. २५९ (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राहनाल (चर्नीपाडा) खोली क्र २ तालुका भिवंडी जिल्हा ठाणे),
१३५ शहापूर अ.ज. मतदान केंद्र क्र. – १७१ (जिल्हा परिषद शाळा, ता. वासिंद),
१३६ भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघ – मतदान केंद्र क्र.१६७ (रईस हायस्कूल भिवंडी, जुना ठाणा रोड, जुनी बिल्डींग, रु. नं. ३, ता. भिवंडी, जि. ठाणे),
१३७ भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघ – मतदान केंद्र क्र. ३१७ (भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका शाळा क्र.५१, तळमजला, खोली क्र १, भादवड गाव, ता.भिवंडी, जि.ठाणे, पि.नं.४२१३०२)
१३८ कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ – मतदान केंद्र क्र. – २९२ (होलीक्रॉस हायस्कूल, नवी इमारत, तळमजला, चिकनघर, कल्याण),
१३९ मुरबाड विधानसभा मतदारसंघ – मतदान केंद्र क्र. २४१(हेवन बेल कॉन्वेंट स्कुल शिरगाव आपटेवाडी तळ मजला खोली क्रमांक 1 बदलापूर पूर्व),
१४० अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ – मतदान केंद्र क्र. १९ (महात्मा गांधी विद्यालय, अंबरनाथ पश्चिम,खोली क्र.१ (तळ मजला) शास्त्रीनगर वांद्रापाडा),
१४१ उल्हासनगर विधानसभा मतदारसंघ – मतदान केंद्र क्र. ९५ (वेदांत कॉलेज, तळमजला रूम नं १,विठ्ठलवाडी स्टेशन रोड, उल्हासनगर-३),
१४२ कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ – मतदान केंद्र क्र – ११८ (कल्याण डोंबिवली महानगरपालिका शाळा जरीमरी माता प्राथमिक शाळा क्र. १८ तळमजला खोली क्र. 1 विजयनगर ता. कल्याण),
१४३ डोंबिवली विधानसभा मतदारसंघ – मतदान केंद्र क्र. २६१ (ओमकार इंटरनॅशनल स्कूल, डोंबिवली पूर्व)
१४४ कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ – मतदान केंद्र क्र. – १८९ आसदे (ओमकार इंग्लिश मिडीयम स्कूल, एम.आय.डी.सी निवासी विभाग फेज २ डोंबिवली पूर्व) मतदान केंद्र क्र. ३८४, (लोढा वर्ल्ड स्कूल, पलावा, तळमजला, खोली क्र. १ निळजे, ४२१२०४),
१४५ मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघ- मतदान केंद्र क्र.४१९(ए.पी. इंटरनॅशनल स्कूल, खोली क्र. २ मिरागाव),
१४६ ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघ – मतदान केंद्र क्र. ४८४(लोढा वर्ल्ड स्कूल, तळ मजला, रुम नंबर १, लोढा कॉम्प्लेक्स जवळ, माजिवडा, ठाणे),
१४७ कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघ – मतदान केंद्र क्र. १९९(नेपच्यून इलेमेंट आय टी पार्क, मोकळ्या जागेत मंडप क्र. १ रोड नं. २२ वागळे इस्टेट, ठाणे),
१४८ ठाणे विधानसभा मतदारसंघ – मतदान केंद्र क्र. ३१९, (एन.के.टी. कॉलेज, तळमजला, पार्टीशन २ खारकर आळी ठाणे),
१४९ कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघ – मतदान केंद्र क्र. ५० लघुपाटबंधारे विभाग, कळवा.
१५० ऐरोली विधानसभा मतदारसंघ – मतदान केंद्र क्र. १५६ (सरस्वती विद्यालय, तळमजला, पार्टीशन ६ सेक्टर ५ ऐरोली),
१५१ बेलापूर विधानसभा मतदारसंघ -मतदान केंद्र क्र. १२८ (सेवेन्थ डे ॲडवान्टेज हायर सेकंडरी स्कूल तळमजला रूम नं. १ सेक्टर २८ सानपाडा, नवी मुंबई).
याशिवाय जिल्ह्यातील १३६ भिवंडी पश्चिम, १३७ भिवंडी पूर्व व १४९ कळवा मुंब्रा या ठिकाणी मतदान केंद्रेही तयार करण्यात आली आहेत.