
सीबीएसई बोर्ड परीक्षेचे डेटशीट लवकरच
पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSC) दहावी-बारावीचा अभ्यासक्रम १५ टक्क्यांनी कमी केला आहे. याशिवाय परीक्षा पद्धतीतही बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार ४० टक्के गुण अंतर्गत मूल्यांकनासाठी आणि उर्वरित ६० टक्के गुण अंतिम परीक्षेसाठी दिले जातील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या ओझ्यातून वाचवून विषय सखोलपणे समजून घेण्याची संधी देणे, हा यापाठीमागचा उद्देश आहे. अभ्यासक्रमातील कपात हा मंडळाच्या विकसित शैक्षणिक रच- नेशी सुसंगत आहे. २०२५ च्या सीबीएसई परीक्षेचा पॅटर्नही बदलण्यात आला आहे. त्यानुसार दहावी-बारावीच्या दोन्ही वर्गासाठी अंतर्गत मूल्यांकनासाठी ४० टक्के गुण निश्चित करण्यात आले आहेत, तर उर्वरित ६० टक्के गुण अंतिम लेखी परीक्षेवर आधारित असतील. बोर्डाच्या यंदाच्या परीक्षा मंडळाकडून लवकरच दहावी - बारावीसाठी डेटशीट प्रसिद्ध करण्यात येईल.

नेमकं कारण काय? मुंबई : मुंबई विद्यापीठातर्फे (Mumbai University) आज पीएचडी पूर्व परीक्षेची पेट परीक्षा (PHD PET Exam) आयोजित करण्यात आली होती. मात्र या परीक्षेबाबत ...
मागील वर्षांचा पॅटर्न लक्षात घेता, पुढील महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्ये डेटशीट रिलीज होईल, अशी अपेक्षा आहे. वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी ते अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करू शकतील. तसेच १५ फेब्रुवारी २०२५ पासून बोर्डाच्या परीक्षा होणार असल्याचे अगोदरच जाहीर करण्यात आले आहे.
दोन टर्ममध्ये परीक्षा घेण्याची तयारी
पुढील वर्षी दोन टर्ममध्ये परीक्षा घेण्याची तयारी सुरू आहे. या बदलाला अंतिम स्वरूप देण्यात आले असून, लॉजिस्टिकची तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दोन टर्म परीक्षा मॉडेलचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना अधिक वारंवार मूल्यांकनाच्या संधी उपलब्ध करून देणे आहे.