मुंबईकरांनो प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा
मुंबई : मुंबईकरांची लाईफलाईन मानली जाणाऱ्या लोकलचे (Mumbai Local) अभियांत्रिकी आणि देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी मेगाब्लॉक (Railway Megablock) घेण्यात येतो. यावेळी अनेक लोकल रद्द होत असल्यामुळे प्रवाशांचे हाल होताना दिसून येतात. अशातच उद्या देखील प्रशासनाने तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक जारी केला आहे.
मध्य रेल्वेच्या (Central Raillway) मुख्य आणि हार्बर मार्गावर (Harbour Line) अभियांत्रिकी आणि देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी, पश्चिम रेल्वे (Western Railway) मार्गावर गर्डर उभारणीच्या कामासाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
Railway Megablock : प्रवाशांचा खोळंबा! पुढील दोन दिवस पश्चिम रेल्वेवर १२ तासांचा मेगाब्लॉक
-
मध्य रेल्वे मेगाब्लॉक
मध्य रेल्वेच्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर उद्या सकाळी ११ वाजून ५ मिनिटांनी ते दुपारी ३ वाजून ५५ मिनिटांच्या सुमारास मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.
-
हार्बर लाईन मेगाब्लॉक
हार्बर मार्गावर कुर्ला आणि वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११ वाजून १० मिनिटे ते ४ वाजून १० मिनिटे या कालावधीत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
या कालावधीत सकाळी १० वाजून ३४ मिनिटं ते दुपारी ३ वाजून ३६ मिनिटांपर्यंत सीएसएमटीवरून सुटणाऱ्या वाशी/बेलापूर/पनवेल डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशीसाठी सकाळी १० वाजून १६ ते दुपारी ३ वाजून ४७ मिनिटांपर्यंत सुटणाऱ्या सीएसएमटीसाठी अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
तसेच यावेळी सीसीएसएमटी ते कुर्ला आणि कुर्ला ने पनवेल/वाशी दरम्यान विशेष सेवा चालविण्यात येणार आहेत.
-
पश्चिम रेल्वेवर १२ तासांचा मेगाब्लॉक
पश्चिम रेल्वेवरील जोगेश्वरी आणि गोरेगाव दरम्यान पुलाच्या बांधकामासाठी अप आणि डाऊन मार्गावर १२ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक शनिवारी रात्री १२ वाजून ३० मिनिटे ते रविवारी सकाळी ११ वाजून ३० मिनिटांच्या कालावधीत असणार आहे.