मुंबई : रेल्वे प्रशासनाकडून (Railway Administration) दर रविवारी यंत्रणा व झालेले तांत्रिक बिघाडाचे दुरुस्तीचे काम हाती घेतले जाते. त्यामुळे दर रविवारी रेल्वे मार्गावर काही काळासाठी मेगाब्लॉक (Railway Megablock) घेण्यात येतो. अशातच आता पश्चिम रेल्वेकडूनही (Western Railway) पुढील दोन दिवस मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवार आणि रविवारी तब्बल १२ तासांचा मेगाब्लॉक आयोजित केला आहे. त्यामुळे प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, असे आवाहन पश्चिम रेल्वेने केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जोगेश्वरी आणि गोरेगाव स्थानकादरम्यान एका पुलाच्या कामासंदर्भात हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवार १६ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास ब्लॉकची सुरुवात होणार असून हा ब्लॉक रविवार १७ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. या कालावधीत प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्यामुळे अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील गाड्या राम मंदिरवगळता अंधेरी आणि गोरेगाव/बोरिवली स्थानकांदरम्यान जलद मार्गावर चालवल्या जातील.
Assembly Election: विधानसभा निवडणुकीसाठी मध्य रेल्वे सोडणार विशेष गाड्या
तसेच हार्बर रेल्वे मार्गावरही या ब्लॉकचा परिणाम होणार आहे. मध्य रेल्वेकडून (Central Railway) हार्बर मार्गावरील (Harbour Line) सर्व उपनगरीय सेवा आणि चर्चगेट ते गोरेगाव/बोरिवली दरम्यानच्या काही धीम्या सेवा अंधेरीपर्यंतच असतील. मेगाब्लॉक कालावधीत सर्व मेल व एक्स्प्रेस १० ते २० मिनिटे उशिराने धावणार आहेत. (Railway Megablock)