मुंबई: जसजसे वय वाढते तसतसे नजर कमजोर होत जाते. मात्र आजकाल कमी वयातही डोळ्यांची नजर कमी होऊ लागली आहे. याचे एक मुख्य कारण शरीरातील पोषकतत्वांची कमतरता हे आहे.नजर कमकुवत होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. अनेकदा एखाद्या आजारामुळे डोळ्यांची नजर कमी होऊ लागे. अनेकदा डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी गाजर खाण्याचा सल्ला दिला जातो.
गाजरामध्ये बीटा-कॅरोटीन नावाचे अँटीऑक्सिडंट असते. डोळ्यांच्या आरोग्यासाठी हे व्हिटामिन अतिशय फायदेशीर असते. मात्र तुम्हाला गाजर खाणे आवडत नसेल तर असे एक ड्रायफ्रुट आहे जे खाल्ल्याने डोळ्यांचे आरोग्य सुधारते.
एका नव्या संशोधनानुसार असे समोर आले आहे की पिस्ता खाल्ल्याने डोळ्यांचे आरोग्य चांगले राखले जाते. पिस्तामध्ये ल्युटीन नावाचे अँटीऑक्सिडंट असते जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. डोळ्यांना निळ्या किरणांपासून होणाऱ्या नुकसानापासून बचावासाठी पिस्ता फायदेशीर आहे. ल्युटिन डोळ्यांच्या रेटिनासाठी फायदेशीर मानले जाते.
Sleep: तुम्ही रोज रात्री १२ नंतर झोपता का? तर जरूर वाचा ही बातमी
जर तुम्ही दररोज पिस्ताचे सेवन करत असाल तर यामुळे शरीरात ल्युटिनचा स्तर केवळ १२ आठवड्यांत दुप्पट होतो. पिस्तामध्ये ल्युटिनसोबत नॅचरल फॅट्सही आढळतात. यामुळे शरीरात शोषले जाते. दररोज ५० ग्रॅम पिस्ता खाल्ल्याने तुम्हाला शरीरात बदल दिसतील.
टीप – वर लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. प्रहार याची पुष्टी करत नाही. कोणताही सल्ला अमलात आणण्याआधी तज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.