Friday, February 7, 2025
Homeताज्या घडामोडीभूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं गुजरात

भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं गुजरात

गांधीनगर: गुजरातच्या मेहसाणामध्ये शुक्रवारी रात्री भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ४.२ इतकी नोंदवण्यात आली. या घटनेंतर स्थानिकांमध्ये प्रचंड घबराहटीचे वातावरण होते. तसेच २००१ च्या भूकंपाची आठवण झाल्यामुळे मेहसाणा येथे अनेकांनी रात्र जागवून काढली. दरम्यान या भूकंपामुळे कुठलीही जीवित किंवा वित्तहानी झाली नसल्याची माहिती प्रशासनाने आज, शनिवारी सकाळी दिली.

https://prahaar.in/2024/11/15/fire-in-bkc-metro-station/

यासंदर्भातील माहितीनुसार गुजरातच्या मेहसाणा, पाटण, बनासकांठा, पालनपूर, साबरकांठा येथे शुक्रवारी रात्री भूकंपाचे धक्के जाणवले. लोकांच्या म्हणण्यानुसार, भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की त्यांना घराबाहेर पळावे लागले. लोक अजूनही घाबरलेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून हवेत गारठा निर्माण झाला आहे. परंतु, त्यानंतरही अनेक लोकांनी शुक्रवारची रात्र जागून काढली. भूकंपाच्या एका धक्क्यानंतर पहाटेच्या सुमाराला पुन्हा धक्के बसण्याची शक्यता असते. त्यामुळे घाबरलेल्या नागरिकांनी संपूर्ण रात्र जागून काढली. राज्यात २३ वर्षांपूर्वी झालेल्या विनाशकारी भूकंपाच्या आठवणी मनात ताज्या असल्यामुळे भूकंपाचे हादरे बसलेल्या परिसरात भीतीचे वातावरण होते. यापूर्वी २००१ मध्ये गुजरातच्या कच्छमध्ये भीषण भूकंप झाला होता, ज्यामध्ये १३ हजारांहून अधिक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. गुजरात राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार, गेल्या २०० वर्षांत राज्यात ९ मोठे भूकंप झाले असून २००१ चा भूकंप सर्वाधिक प्राणघातक ठरला होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -