Friday, May 9, 2025

देशमनोरंजनताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Nayanthara News : फक्त ३ सेकंदांच्या व्हिडीओसाठी ठोकला १० कोटी रुपयांचा दावा

Nayanthara News : फक्त ३ सेकंदांच्या व्हिडीओसाठी ठोकला १० कोटी रुपयांचा दावा

मुंबई : बॉलीवूड आणि टॉलीवूडमधली बिनधास्त कॅरेक्टर करणारी अभिनेत्री नयनतारा सध्या तिच्या ‘नयनतारा : बियॉण्ड द फेयरी टेल’ या डॉक्युमेंट्रीमुळे चांगली चर्चेत आली आहे. या डॉक्युमेंट्रीमुळे नयनताराच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण- साऊथचा अभिनेता धनुषने त्याच्या ‘नानुम राउडी धान’ चित्रपटातील ३ सेकंदांच्या क्लिपचा वापर डॉक्युमेंट्रीमध्ये केल्याचा दावा त्याने केला आहे. तसेच याबाबत ‘नयनतारा : बियॉण्ड द फेयरी टेल’च्या निर्मात्यांवर कॉपीराईट हक्काचे उल्लंघन केल्यावरून १० कोटी रुपयांच्या दावा ठोकला आहे. आता नयनतारा चांगलीच भडकली असून, तिने याबाबत सोशल मीडियावर एक मोठं पत्र पोस्ट लिहत धनुषला सडेतोड उत्तर दिले आहे.


धनुषने १० कोटींची कॉपीराईटबद्धल दावा केल्याने नयनताराने आपल्या पत्रातून नाराजी व्यक्त केली आहे. तिने यात लिहिले आहे, “आतापर्यंतची ही तुमची सर्वांत वाईट वागणूक आहे. ऑडिओ लाँचच्यावेळी तुम्ही साध्याभोळ्या चाहत्यांसमोर जसं वागता, त्यातील खरे आणि चांगले गुण तुमच्यात खरोखर असते, तर आजचे चित्र काही वेगळे दिसले असते. फक्त ३ सेकंदांच्या व्हिडीओसाठी १० कोटींचा कॉपीराईट दावा करणे यातून तुम्ही कशा प्रकारची व्यक्ती आहात हे दिसून येते.”


आपल्या पत्रात नयनताराने पुढे लिहिले आहे की, ‘नानुम राउडी धान’ या चित्रपटातील काही भाग वापरता यावा यासाठी आम्ही तुम्हाला विनंती केली होती. आम्ही तुम्हाला वारंवार विचारले होते. तुमच्यासुद्धा उत्तराची आम्ही वाट पाहिली. मात्र, तुम्ही मुद्दामून आम्हाला एनओसी दिली नाही. या चित्रपटातील गाण्याचा काही भाग आम्हाला डॉक्युमेंट्रीसाठी हवा होता; मात्र तुम्ही या चित्रपटामधील गाणं आणि फोटो घेण्याचीही परवानगी दिली नाही.



नयनताराने पुढे लिहिलं आहे, “शेवटी आम्ही डॉक्युमेंट्रीमधील तो भाग कट करून, पुन्हा एडिट करण्याचा निर्णय घेतला. डॉक्युमेंट्रीमध्ये असलेला भाग ‘नानुम राउडी धान’ चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी काही व्यक्तींनी आपल्या फोनमध्ये रेकॉर्ड केला होता. त्यावरसुद्धा तुम्ही आक्षेप घेतला आणि केवळ ३ सेकंदांसाठी कायदेशीर कारवाई केली.”






 










View this post on Instagram























 

A post shared by N A Y A N T H A R A (@nayanthara)





“आता तुम्ही पाठवलेली कायदेशीर नोटीस आम्हाला मिळाली आहे. आता आम्हीसुद्धा यावर कायदेशीरचं उत्तरे देऊ. नेटफ्लिक्स डॉक्युमेंट्रीसाठी तुम्ही ‘नानुम राउडी धान’ चित्रपटातील काही भाग वापरण्यावर आम्हाला नकार दिला होता. त्याने तुम्ही न्यायालयात निकाल तुमच्या बाजूने फिरवू शकाल. मात्र, मला तुम्हाला सांगायचे आहे की, या प्रकरणाची आणखी एक नैतिक बाजू आहे”, पत्रामध्ये असे सर्व नमूद करून, शेवटी अभिनेत्री नयनताराने आपल्या कॅप्शनमध्ये लिहिलं ओम नमः शिवाय.






 










View this post on Instagram























 

A post shared by Netflix India (@netflix_in)





१८ नोव्हेंबर २०२४ रोजी ‘नयनतारा : बियॉण्ड द फेयरी टेल’ डॉक्युमेंट्री नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. त्यामध्ये अभिनेत्री नयनताराचा सिनेविश्वातील आतापर्यंतचा प्रवास पाहायला मिळणार आहे. त्यात अभिनेत्रीच्या आयुष्यात आलेल्या आव्हानांचीदेखील झलक पाहायला मिळणार आहे.


Comments
Add Comment