Saturday, May 10, 2025

देशताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Chhattisgarh Encounter : छत्तीसगडमध्ये चकमक सुरुच! आतापर्यंत ५ नक्षलवाद्यांचा खात्मा

Chhattisgarh Encounter : छत्तीसगडमध्ये चकमक सुरुच! आतापर्यंत ५ नक्षलवाद्यांचा खात्मा

छत्तीसगड : छत्तीसगडमध्ये कालपासून सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरूच असल्याचे दिसून येत आहे. आज सकाळीही छत्तीसगडच्या कांकेर नारायणपूर सीमेवरील अबुझमधल्या जंगलात जवानांची मोठ्या नक्षलवाद्यांच्या टोळीसोबत चकमक (Chhattisgarh Encounter) झाली. या चकमकीत २ जवान (Soldier) जखमी झाले असून ५ नक्षलवाद्यांचा (Naxalite) मृत्यू झाला आहे.


दरम्यान, घटनास्थळावर जवानांकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. त्यात मिळालेल्या माहितीनुसार, आणखी काही नक्षलवादी या चकमकीत जखमी झाले आहेत. त्यामुळे नक्षलवादी मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


Comments
Add Comment