Friday, May 9, 2025

महामुंबईताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

चिमुकलीने केला अमित ठाकरेंजवळ आगळावेगळा हट्ट

चिमुकलीने केला अमित ठाकरेंजवळ आगळावेगळा हट्ट
मुंबई : विधानसभेच्या निवडणुकीसाठी सर्वत्र लगबग सुरु आहे . प्रत्येक जण आपल्या गटासाठी वेगवेगळ्या प्रकारे प्रचार करताना दिसत आहे .



अशातच विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मनसेचे अमित ठाकरे घरोघरी जाऊन प्रचार करताना दिसून येत आहेत. त्यांच्या ह्या प्रचारादरम्यान मनसे कार्यकर्ते लक्ष्मण पाटील ह्यांची मुलगी उर्वशी पाटील हिने अमित ठाकरेंजवळ तिच्या मनातील हट्ट पत्राद्वारे व्यक्त केला.





'अमित काका तुम्ही आमदार बनायचंय' अशा नावाचं पत्र चिमुकलीने अमित ठाकरेंच्या हाती दिलं. पत्रात ती म्हणाली " आज आमच्या घरी तुम्ही अमित ठाकरे म्हणून आलात पुढच्या वेळेस तुम्ही आमदार अमित ठाकरे म्हणून या. आमच्या भविष्यासाठी तुम्हाला आमदार व्हावेच लागेल, हा माझा हट्ट आहे आणि तो तुम्ही पूर्ण करायचाच."
Comments
Add Comment