छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणूक (Assembly Election 2024) काही दिवसांवर येऊन ठेपली असताना सर्व राजकीय पक्षांकडून मोठी तयारी सुरु आहे. मात्र अशातच शिंदे शिवसेनेचे (Shinde Shivsena) उमेदवार विलास भुमरे (Vilas Bhumre) यांना मोठी दुखापत झाली आहे. त्यामुळे त्यांचा सुरु असणारा प्रचारही थांबवावा लागत आहे.
महायुती शिंदे सेना गटातील पैठण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार विलास भुमरे भुमरे हे पाचोड येथे आपल्या निवासस्थानी आज पहाटे भोवळ आल्याने गॅलरीमधून खाली पडले. यात ते गंभीर जखमी झाले आहेत.
विलास भुमरे (Vilas Bhumre) यांना छत्रपती संभाजीनगरच्या एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या डाव्या हाताला आणि पायाला फॅक्चर झाले आहे. त्यामुळे विलास भुमरे यांचे पुढील प्रचाराचे दौरे रद्द करण्यात आले आहेत.