Monday, February 10, 2025
Homeमहत्वाची बातमीDevendra Fadnavis : महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी कोणतेही निकष ठरलेले नाहीत आणि मी मुख्यमंत्रि‍पदाच्या...

Devendra Fadnavis : महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी कोणतेही निकष ठरलेले नाहीत आणि मी मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत नाही

मुंबई : मी राज्याचा मुख्यमंत्री व्हावे, अशी भाजप पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पण आता मुख्यमंत्री होणे हे सर्व माझ्यासाठी गौण आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाची कोणतीही शर्यत नाही आणि अशा शर्यतीत मी सहभागी नाही, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात असणार की दिल्लीत याबाबतच्या चर्चेला पुन्हा तोंड फुटण्याची शक्यता आहे.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला गेल्यावेळपेक्षा जास्त जागा मिळतील, असा विश्वास व्यक्त केला. राज्यात २०१९ला आमच्या १०५ जागा आल्या. आता त्याहीपेक्षा आमच्या जास्त जागा येतील. त्यापेक्षा कमी येणार नाहीत. विदर्भातही आम्हाला चांगला प्रतिसाद मिळेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Ramdas Kadam : कोणाला कसे फटके द्यायचे, कोणाला लादीवर झोपवायचे हे सर्व मला माहितीय! तुझ्या बापाला आधी विचार…

यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महायुतीच्या जागावाटपात शिंदे गटाला अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा जास्त जागा का मिळाल्या, या प्रश्नाचे उत्तर दिले. एकनाथ शिंदे हे जवळपास अडीच वर्षे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी त्यांची ताकद निर्माण केली. अजित पवार एक वर्षे उशिराने सरकारमध्ये आले. त्यांना दीड वर्षेच मिळाले. त्यातही अजित पवार यांना शरद पवार यांच्यासारख्या तगड्या नेत्यासोबत लढा द्यायचा असल्याने त्यांची सर्व ताकद प्रयत्नपूर्वक एकवटायची होती. त्यातच त्यांचा सुरुवातीचा काळ गेला. एकनाथ शिंदे यांच्याकडे पुरेसा वेळ होता. त्यांनी त्यांची ताकद एकवटत विस्ताराकडेही लक्ष दिले. शिवाय त्यांना मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याचाही फायदा मिळाला. त्यामुळेच त्यांना लढविण्यासाठी जास्त जागा मिळाल्या, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

तसेच महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी जास्त जागा, स्ट्राइक रेट असे कोणतेही निकष ठरलेले नाहीत. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे, अजित पवार आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष एकत्र बसून निर्णय घेतील, असेही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -