Saturday, February 8, 2025
Homeसंपादकीयविशेष लेख५५वा इफ्फी महोत्सव: संस्कृती जोडणारा सेतू

५५वा इफ्फी महोत्सव: संस्कृती जोडणारा सेतू

५५वा इफ्फी महोत्सव हा अविरतपणे परंपरा आणि भविष्यातील विचारसरणी यांचा मेळ घालत नवोन्मेषाला गवसणी घालतो, भारतीय चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या महान व्यक्तिमत्त्वांचा आदर करून उद्याच्या प्रतिभेला संधी प्रदान करतो. भारत पर्वच्या उत्साहपूर्ण भावनेपासून ते उद्योन्मुख प्रतिभेसाठी नवीन पुरस्काराच्या पदार्पणापर्यंत, इफ्फी २०२४ सिनेमाच्या उत्क्रांत स्वरूपाला मूर्त रूप देते आणि जोडण्याचे साधन म्हणून असलेली कथाकथनाची शक्ती साजरी करते. हा महोत्सव आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्माते, उद्योगातील नेते आणि प्रेक्षक यांना एकत्र आणत असल्याने, जागतिक चित्रपटसृष्टीत भारताला महत्त्वाचे स्थान प्रदान करतो आणि चिरस्थायी प्रभाव आणि दृष्टीचा उत्सव म्हणून इफ्फीचा पुनरुच्चार करतो.

चैतन्य के. प्रसाद

५५ वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, इफ्फी २० ते २८ नोव्हेंबर २०२४ दरम्यान गोव्याच्या नितांत सुंदर, रम्य समुद्रकिनारी सिनेमॅटिक उत्सवाची एक ताजी झुळूक घेऊन येण्यासाठी सज्ज आहे. या वर्षीचा महोत्सव हा केवळ चित्रपट प्रदर्शनाचे आश्वासन देत नसून जागतिक संस्कृतींचा मिलाफ, उद्योन्मुख आवाजांना ओळख मिळवून देणारे हक्काचे व्यासपीठ आणि भारताच्या सिनेमॅटिक वारशाला वाहिलेली एक भावपूर्ण आदरांजली या सर्वांचा मिळून एकत्रित अनुभव असेल. या महोत्सवाच्या जडणघडणीतील नावीन्यासोबतच एक आगळावेगळा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणून भारताची चैतन्यमय संस्कृती आणि चित्रपट कला या दोन्ही गोष्टी एकाचवेळी जागतिक मंचावर साजऱ्या केल्या जातील आणि म्हणूनच इफ्फी २०२४ हे पुढे टाकलेले एक धाडसी पाऊल आहे, असे म्हणावे लागेल.

यावर्षी इफ्फीसाठी कंट्री ऑफ फोकस म्हणून ऑस्ट्रेलियाची निवड करण्यात आली असून संस्कृतींना जोडणे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहकार्य वृद्धिंगत करण्याच्या या महोत्सवाची वचनबद्धता यातून प्रतीत होते. या विभागात भारतीय प्रेक्षकांना ऑस्ट्रेलियन सिनेमांचा आस्वाद घेता येणार असून यामध्ये छोट्या नाटकांपासून ते साहसी, विनोदी आणि सखोल माहितीपटांपर्यंत सर्व प्रकारच्या चित्रपटांची निवड केली जाते. अशा प्रकारे लक्ष केंद्रित केलेल्या लेन्सद्वारे, प्रेक्षकांना ऑस्ट्रेलियाची अनोखी आणि विकसित होणारी सिनेमॅटिक भाषा अनुभवता येईल, त्यामुळेच इफ्फी हे सांस्कृतिक देवाणघेवाणी संदर्भातील कौतुकाचे आणि संवादाचे एक शक्तिशाली व्यासपीठ बनते. हे करत असताना इफ्फी पारंपरिक चित्रपट प्रदर्शनाच्या पलीकडे एका अविस्मरणीय अनुभवाची निर्मिती करते आणि त्यातूनच कथा, लोक आणि जगभरातल्या संस्कृतींचा एकमेकांशी अनोखा बंध निर्माण होतो.

इफ्फी २०२४च्या नव्या आवृत्तीत “पदार्पणातील सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट दिग्दर्शक” पुरस्कार दिला जाणार असून उद्योन्मुख भारतीय चित्रपट निर्मात्यांना या पुरस्काराने गौरवले जाणार आहे. पुरस्कारप्राप्त युवा दिग्दर्शकाला यामुळे केवळ ओळख मिळेल असे नव्हे तर देशातील युवा दिग्दर्शकांच्या कारकिर्दीतील हा एक महत्त्वाचा क्षण असेल कारण हा पुरस्कार भारतीय चित्रपटसृष्टीतील नवीन दृष्टिकोनांचे स्वागत करून एक नवीन मार्ग चोखाळतो. ही श्रेणी पहिल्यांदाच पदार्पण करणाऱ्या दिग्दर्शकांसाठी समर्पित करून इफ्फीने तरुण चित्रपट निर्मिती प्रतिभेची दखल घेण्याच्या आणि दिवसेंदिवस वाढत जाणारी तीव्र स्पर्धा असलेल्या या उद्योगात एक ओळख प्राप्त करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे.

या वर्षीच्या महोत्सवात राज कपूर, मोहम्मद रफी, तपन सिन्हा आणि अक्किनेनी नागेश्वर राव या भारतीय चित्रपट क्षेत्रातील चार दिग्गज व्यक्तिमत्त्वांना आदरांजली वाहण्यात येणार आहे. या महान कलावंतांनी भारतीय चित्रपटांच्या वारशाला एक आकार दिला आणि प्रेक्षकांच्या कित्येक पिढ्यांच्या मनावर अधिराज्य केले. या दिग्गजांच्या जतन केलेल्या आणि पुनर्संचयित केलेल्या अभिजात कलाकृतींचे वैशिष्ट्यपूर्णरीतीने सादरीकरण केले जाणार आहे. इफ्फीच्या माध्यमातून नवीन पिढीसाठी त्यांच्या कलात्मकतेला पुनरुज्जीवित करून आंतरराष्ट्रीय स्तरावरील अतिथींना भारताच्या समृद्ध चित्रपट इतिहासाची अर्थपूर्ण झलक सादर केली जाईल. या अभिवादनातून भारतीय चित्रपटांची गहनता त्यांच्या संस्कृतीवर उमटलेला परिवर्तनीय प्रभाव आणि भारतीय चित्रपट क्षेत्रात अतिशय मोलाचे योगदान देणाऱ्या या दिग्गजांच्या चिरस्थायी प्रासंगिकतेची आठवण करून देते.

इफ्फीमधील फिल्म बाजारची यंदाची १८वी आवृत्ती असून चित्रपट निर्माते, वित्तपुरवठादार, वितरक आणि आंतरराष्ट्रीय उद्योगातील धुरिणांना एकत्र आणणारे डायनॅमिक मार्केटप्लेस म्हणून फिल्म बाजारने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. फिल्म बझारमधील व्ह्यूइंग रूममध्ये २०० हून अधिक चित्रपट दाखवले जातात, त्यामुळेच फिल्म बाजार हे असे स्थान आहे जिथे कथा स्वतःच आपले गुंतवणूकदार शोधतात, चित्रपट आपल्या वितरकांशी जोडले जातात आणि एकत्रित कार्य सुरू होते. या समर्पित व्यासपीठामुळे इफ्फी हा चित्रपट प्रदर्शनावर आधारित इतर महोत्सवांपेक्षा वेगळा ठरतो. कारण इफ्फीचे स्वरूप त्याहून अधिक व्यापक आहे. याठिकाणी अनेक प्रकल्प उदयाला येतात आणि महोत्सवाच्या पलीकडे संधी उपलब्ध होतात. फिल्म बाजार हे जागतिक प्रेक्षकांसाठीचे प्रवेशद्वार असून भारतीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मात्यांसाठी देखील भविष्यातील प्रकल्पांसाठी नेटवर्क आणि सुरक्षित पाठबळाची दुर्मीळ संधी प्रदान करते.
इफ्फीमधील इंडियन पॅनोरमा हा विभाग तर संपूर्ण महोत्सवाचा मेरुमणी ठरला आहे. या विभागतील समकालीन भारतीय सिनेमांची वैविध्यपूर्ण निवड प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करते. सिनेमॅटिक उत्कृष्टता, आशयघन अनुनाद आणि सौंदर्यात्मक सर्जनशीलतेसाठी इंडियन पॅनोरामामध्ये निवडलेले २५ वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट आणि २० नॉन-फीचर चित्रपट, भारतीय कथाकथनातील जिवंतपणा आणि विविधता दर्शवतात. आंतरराष्ट्रीय अतिथिंना, भारताच्या सामाजिक-सांस्कृतिक परिदृश्याची एक निखळ दृष्टी इंडियन पॅनोरमामधून मिळू शकेल, तसेच प्रादेशिक कथांपासून ते प्रायोगिक आणि मूलगामी प्रयोगांपर्यंत सर्व गोष्टींवर प्रकाश टाकते. हा विभाग भारतीय चित्रपटाला त्याची आशयघनता आणि वैविध्य सादर करण्याच्या इफ्फीच्या ध्येयदृष्टीला बळकटी देतो, त्यामुळेच हा विभाग चित्रपटाच्या माध्यमातून सीमा ओलांडून जागतिक सांस्कृतिक देवाणघेवाणीचा एक अमूल्य भाग ठरतो.

इफ्फी २०२४ मधील एक अतिशय लक्षवेधक उपक्रम म्हणजे माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (NFDC) यांचा युवा चित्रपट निर्मात्यांमधील प्रतिभेला चालना देणारा युवककेंद्रित आणि समर्पित “क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो” हा उपक्रम. या माध्यमातून लघुपट, माहितीपट आणि ॲनिमेशनपट क्षेत्रात उद्योन्मुख प्रतिभावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते ज्यामुळे ते अनुभवी उद्योग व्यावसायिकांशी सहजपणे जोडले जातात. क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो या उपक्रमातून केवळ युवा प्रतिभावंतांच्या कलेचा अाविष्काराच पाहायला मिळत नाही तर या भविष्यातील भारतीय चित्रपटनिर्मात्यांना उपलब्ध साधनसंपत्ती आणि यशासाठी आवश्यक धागेदोरे यांची सांगड घालून दिली जाते. हा उपक्रम सर्जनशीलता आणि वाढीस पोषक ठरणारा उत्सव म्हणून इफ्फीची भूमिका मजबूत करतो.
कान्स २०२४ चित्रपट महोत्सवामध्ये जगाचे लक्ष वेधून घेतलेल्या भारतपर्वच्या धर्तीवर इफ्फीदेखील भारताच्या वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारशाचा उत्सव जगासमोर उलगडून दाखवतो. भारत पर्व, अर्थात भारताची समृद्ध परंपरा आणि विविधतेतील एकता अधोरेखित करणारा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम असून, इफ्फीमध्ये देखील याची सिनेमॅटिक अभिव्यक्ती पाहायला मिळते आणि चित्रपट, बहुविध कार्यक्रम आणि प्रोग्रामिंग क्षेत्रातील भारताची बहुआयामी ओळख सिद्ध होते. भारतीय संस्कृतीचा हा उत्सव आंतरराष्ट्रीय अभ्यागतांना एक तल्लीन करणारा अनुभव आणि भारताच्या कथेची सखोल माहिती प्रदान करतो, सिनेमाच्या शक्तिशाली लेन्सद्वारे त्याच्या वारशाची झलक दाखवतो. भारतीय चित्रपटसृष्टीसाठी इफ्फी २०२४ एका परिवर्तनाच्या टप्प्यावर पोहोचला असून भारतीय चित्रपट निर्मात्यांना जागतिक मंचावर मानाने अत्युच्च स्थानी कार्य करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करत आहे. उद्योन्मुख प्रतिभा, जागतिक अनुबंध आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यावर महोत्सवाचा भर असून कलासृष्टीत जगाचे नेतृत्व करण्याच्या भारताच्या महत्त्वाकांक्षेशी तो तादात्म पावणारा आहे. इफ्फीचे चित्रपट उद्योग संदर्भात उपक्रमांचे अनोखे संयोजन, युवा प्रतिभेची ओळख आणि सिनेमॅटिक वारसा यांचा अनोखा मिलाफ या सर्व गोष्टी भारतीय सिनेमाची वृद्धी आणि जागतिक स्तरावर त्याला मिळणारा प्रतिसाद द्विगुणित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. या वर्षीची महोत्सवाची आवृत्ती चित्रपट उद्योगावर एक अमीट ठसा सोडणारी असून भारतीय चित्रपटांच्या समृद्ध संस्कृतीचा वारसा प्रतिबिंबित करण्याबरोबरच भविष्यालाही आकार देणारी असेल.

आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मात्यांना इफ्फी २०२४ मधून भारताच्या चैतन्यदायी सिनेमॅटिक परिदृश्याशी जोडण्याची एक अनोखी संधी प्राप्त होते. या महोत्सवाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर भारतीय प्रेक्षक जोडले जातात, फिल्म बाजारच्या संसाधनांमध्ये प्रवेश प्राप्त होतो आणि ऑस्ट्रेलियन शोकेससारख्या विभागांमध्ये काम करून इफ्फी आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मात्यांना भारतीय अभिरुची, कल आणि येथे उपलब्ध असलेल्या संधींबद्दल अंतर्दृष्टी प्रदान करते. इफ्फीमध्ये प्रतिष्ठित भारतीय कलाकारांना वाहिलेली श्रद्धांजली देखील एक समृद्ध सांस्कृतिक संदर्भ प्रदान करते, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय अभ्यागतांना भारतीय चित्रपटाचा वारसा आणि योगदान याबद्दल जाणीव निर्माण होते. या परस्पर संवाद प्रक्रियेमुळे इफ्फी एक अद्वितीय, सहकार्यात्मक वातावरण तयार करते, जे भारतीय आणि जागतिक चित्रपटांना समृद्ध करत जाते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -