Sunday, December 15, 2024
Homeताज्या घडामोडीWater Supply : दक्षिण पुणे परिसरात उद्या पाणीपुरवठा बंद!

Water Supply : दक्षिण पुणे परिसरात उद्या पाणीपुरवठा बंद!

पुणे : पुणे शहरातील (Pune News) पद्मावती परिसरात मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी दक्षिण पुण्याचा पाणीपुरवठा उद्या बंद (Water Supply Closed) ठेवला जाणार आहे. त्याचप्रमाणे रविवारी सकाळी उशिरा कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे पुणेकरांनी वेळे आधीच पाण्याचा साठा करुन पाणी जपून वापरा, असे आवाहन पुणे महापालिकेकडून करण्यात येत आहे.

पुण्यातील पर्वती एचएलआर गोल टाकीवरून पद्मावती पंपिंग स्टेशनला येणाऱ्या १००० मिलिमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनीमध्ये पद्मावतीमधील अवंती सोसायटीजवळ गळती सुरू झाली आहे.त्यामुळे दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा होणाऱ्या सेमिनरी टाकी, बिबवेवाडी टाकी, तळजाई टाकी, अप्पर इंदिरानगर पंपिंग स्टेशन येथील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

पुणे-गोरखपूर एक्सप्रेसमध्ये पैसे वसूल करत होता तोतया ‘टीसी’

कोणत्या भागात पाणीपुरवठा बंद?

सहकारनगर, पद्मावती, वनशिव वस्ती, तिरुपतीनगर, चव्हाणनगर, संभाजीनगर, तळजाई, बिबवेवाडी, मुकुंदनगर काही भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणीनगर भाग १ व २, लेक टाऊन, शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, सुपर इंदिरानगर, शेळकेवस्ती, महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, आंबेडकरनगर, डायस प्लॉट, ढोलेमळा, सॅलीसबरी पार्क, गिरीधर भवन चौक, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, सेमिनरी झोनवरील मिठानगर, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, ज्ञानेश्वरनगर, साईबाबानगर, सर्व्हे नं. ४२, ४६ (कोंढवा खुर्द) इत्यादी परिसर, पद्मावती टँकर भरणा केंद्र, पर्वती दर्शन, धनकवडी परिसर (पार्ट), गुलाबनगर, राऊत बाग, पुण्याईनगर, काशिनाथ पाटीलनगर, के. के. मार्केट परिसर, मनमोहन पार्क, तोडकर टाऊनशीप, स्टेट बँकनगर, ओम अभिषेक, ओम अलंकार, वास्तुकल्प, गृहकल्प सोसायटी, दामोदरनगर, विद्यासागर सोसायटी, २७६ ओटा परिसर, वैभव सोसायटी, कॅनरा बँक परिसर, सुयोग-आदित्य परिसर, योगायोग सोसायटी, रम्यनगरी, जेधेनगर, जनसेवा सोसायटी, नवमित्र सोसायटी, भगली हॉस्पिटल परिसर, कोठारी ब्लॉक, वसंतबाग, अनिकेत सोसायटी, बिबवेवाडी-कोंढवा रस्ता, आईमाता मंदिर परिसर, गंगाधाम, गगनविहार, गगनगॅलॅक्सी, विद्यासागर सोसायटी, सोपान महाराज सोसायटी, मार्केट यार्ड संपूर्ण परिसर. (Pune Water Supply)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -