Friday, December 13, 2024
Homeमहाराष्ट्रठाणे'फोटो सर्कल सोसायटी'च्या छायाचित्र प्रदर्शनाला ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

‘फोटो सर्कल सोसायटी’च्या छायाचित्र प्रदर्शनाला ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ठाणे: फोटो सर्कल सोसायटीच्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त १० ते १७ डिसेंबर दरम्यान राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय छायाचित्र प्रदर्शन – `आविष्कार – २०२४’ चे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शन आणि या निमित्त आयोजित कार्यशाळांना ठाणेकर भरभरुन प्रतिसाद देत आहेत.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननिय बाळासाहेब ठाकरे स्मारक, इटर्निटी सोसायटीजवळ, ज्ञानसाधना कॉलेज रोड, तीन हात नाका, ठाणे पश्चिम येथे हे छायाचित्र हे प्रदर्शन भरले आहे. १० नोव्हेंबर रोजी प्रदर्शनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेता आणि वन्यजीव प्रकाशचित्रकार सुयश टिळक यांच्या हस्ते संपन्न झाले. ११ नोव्हेंबर रोजी मंदार सोमवंशी यांची मोबाईल फोटोग्राफी कार्यशाळा, १२ नोव्हेंबर रोजी विकास शिंदे यांची टेबलटॉप व फूड छायाचित्रण कार्यशाळा, १३ नोव्हेंबर रोजी फॅशन फोटोग्राफी या विषयावर मयूर नारंगीकर यांची कार्यशाळा, १४ नोव्हेंबर रोजी निसर्ग व वन्यजीव अभ्यासक सागर गोसावी यांचे ‘ हिमालियन वन्यजीवन ‘ या विषयावर फिल्म स्क्रिनींग संपन्न झाले.

https://prahaar.in/2024/11/05/dombivilimdhe-marathi-rangbhoomi-din-sajra/

१५ नोव्हेंबर रोजी स्वप्नाली मठकर यांनी मोबाईल फोटोग्राफी कार्यशाळा सायंकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत संपन्न होईल.१६ नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ छायाचित्रकार मेळावा सायंकाळी ४ ते ६ वाजेपर्यंत संपन्न होणार आहे. सदर मेळाव्यात जेष्ठ छायाचित्रकार व वन्यजीव अभ्यासक केदार भिडे यांचे ‘ डिजिटल पूर्वी व डिजिटल नंतर ‘ या विषयावर चर्चासत्र होईल. १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता आविष्कार २०२४ पारितोषिक वितरण व समारोप सोहळा संपन्न होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ठाणे जनता सहकारी बँकेचे चेअरमन शरद गांगल व सुप्रसिध्द सिने दिग्दर्शक विजू माने उपस्थित राहणार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -