
ठाणे: फोटो सर्कल सोसायटीच्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त १० ते १७ डिसेंबर दरम्यान राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय छायाचित्र प्रदर्शन - `आविष्कार - २०२४' चे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शन आणि या निमित्त आयोजित कार्यशाळांना ठाणेकर भरभरुन प्रतिसाद देत आहेत. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननिय बाळासाहेब ठाकरे स्मारक, इटर्निटी सोसायटीजवळ, ज्ञानसाधना कॉलेज रोड, तीन हात नाका, ठाणे पश्चिम येथे हे छायाचित्र हे प्रदर्शन भरले आहे. १० नोव्हेंबर रोजी प्रदर्शनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेता आणि वन्यजीव प्रकाशचित्रकार सुयश टिळक यांच्या हस्ते संपन्न झाले. ११ नोव्हेंबर रोजी मंदार सोमवंशी यांची मोबाईल फोटोग्राफी कार्यशाळा, १२ नोव्हेंबर रोजी विकास शिंदे यांची टेबलटॉप व फूड छायाचित्रण कार्यशाळा, १३ नोव्हेंबर रोजी फॅशन फोटोग्राफी या विषयावर मयूर नारंगीकर यांची कार्यशाळा, १४ नोव्हेंबर रोजी निसर्ग व वन्यजीव अभ्यासक सागर गोसावी यांचे ' हिमालियन वन्यजीवन ' या विषयावर फिल्म स्क्रिनींग संपन्न झाले.

डोंबिवली: मराठी रंगभूमी दिन हा दरवर्षी ५ नोव्हेंबरला साजरा करण्यात येतो. १८४३ मध्ये विष्णुदास भावे यांनी सांगली मध्ये 'सीता स्वयंवर' नाटक सादर केले ...