सावली आणि सारंगच्या लग्नाची लगबग सुरु

मुंबई: 'सावळ्याची जणू सावली' मालिकेत सारंगच्या आणि सावलीच्या लग्नाची लगबग सुरु झाली आहे. लग्नाच्या तयारीसाठी दोन्ही कुटुंब साडीच्या दुकानात जातात. साऱंग एक सुंदर साडी निवडतो, जी शेवटी सावलीपर्यंत पोहोचते. साऱंग आणि सावलीच्या कुटुंबांनी हळदीचा समारंभ आयोजित केला आहे. अलका गुपचूप साऱंगच्या हळदीला सावलीच्या हळदीसोबत बदलते, आणि ती उष्टी हळद सावलीपर्यंत पोहोचते. सावलीला हळद लागत असताना भैरवी अस्वस्थ आहे. आणि हळदीत गोंधळ घालण्याचा प्रयत्नात आहे. पण जगन्नाथ आणि अलका ही परिस्थिती हाताळतात.



सवालीला हळदीत नटलेलं पाहून अलकाला तिच्या मुलीची आठवण येते, आणि ती भावुक होते. जगन्नाथ तिचं सांत्वन करतो. साऱंगच्या घरी संगीत समारंभादरम्यान भैरवी सावलीला गाणं गाण्यासाठी आमंत्रित करते. परंतु, सावलीच्या घरी हळदी समारंभ सुरू असल्याने घरचे तिला गावाच्या हद्दीतून बाहेर जाण्यास मनाई करतात. तरीही, दिलेला शब्द पाळण्यासाठी सावली सर्व आव्हानं स्विकारून साऱंगच्या घरी गाण्यासाठी जाते. आता लग्नाच्या आदल्या दिवशी, जगन्नाथ त्याचा अंतिम डाव उघड करणार आहे. तर इकडे सारंगच्या घरी लग्नाच्या पूर्वसंध्येला तिलोत्तमाला काही वाईट संकेत आणि अपशकुन असल्याचं जाणवतात.

नियतीने काय लिहलं आहे सारंग आणि सावलीच्या नशीबात ? जगन्नाथने रचलेला कट यशस्वी होईल का? यासाठी बघायला विसरू नका 'सावळ्याची जणू सावली' दररोज संध्या ७ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

Comments
Add Comment

‘दशावतार’ सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; २ दिवसांत केली इतकी कमाई !

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळीच लाट घेऊन आलेल्या ‘दशावतार’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच

रजनीकांत होते 'दशावतार'साठी पहिली पसंत? दिग्दर्शकांचा मोठा खुलासा

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एका चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. तो चित्रपट म्हणजे 'दशावतार'! हा चित्रपट

दिशा पटानीच्या घरावर गोळीबार!

प्रेमानंद महाराजांचा अपमान केल्याच्या आरोपाखाली केला गोळीबार बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीशी संबंधित एक

TMKOC : ४५०० भागांचा टप्पा गाठत ‘तारक मेहता’ने रचला नवा विक्रम

मुंबई : टीव्ही मनोरंजनाच्या विश्वात लोकप्रिय मालिकांचा उल्लेख झाला, तर ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेचं

‘तू माझा किनारा’ – क्रिस्टस स्टीफन यांची मराठी चित्रपटसृष्टीत भावनिक सुरुवात!

मुंबई : चित्रपट निर्माते क्रिस्टस स्टीफन हे आता मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत असून, त्यांचा पहिला मराठी

अभिनेत्री करिश्माने मारली चालत्या लोकलमधून उडी

मुंबई : लोकप्रिय अभिनेत्री करिश्मा शर्मा हिचा मुंबईतील चर्चगेट येथे अत्यंत गंभीर अपघात झाला. करिश्मा स्वतःने