Friday, December 13, 2024
Homeताज्या घडामोडीSolapur Airport : सोलापूरकरांचा मुंबई-गोवा प्रवास होणार सुसाट! 'या' तारखेपासून सुरु होणार...

Solapur Airport : सोलापूरकरांचा मुंबई-गोवा प्रवास होणार सुसाट! ‘या’ तारखेपासून सुरु होणार हवाईसेवा

सोलापूर : सोलापूरकरांचे बहुप्रतीक्षित विमानतळ (Solapur Airport) प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. लवकरच सोलापूर विमानतळाहून उड्डाण होणार आहे. यामध्ये मुंबई-गोवा (Mumbai-Goa) शहरांसाठी थेट उड्डाणांचा समावेश असणार आहे. (Solapur Airlines) त्यामुळे सोलापूरकरांचा मुंबई-गोवा प्रवास अवघ्या काही तासात पार पडणार आहे. होटगी रोड सोलापूर विमानतळावरून फ्लाय ९१ एअरलाईन्सची विमानसेवा २० डिसेंबर २०२४ पासून सुरु होणार आहे, अशी माहिती सोलापूर विकास मंचचे सदस्य विजय जाधव यांनी दिली.

Shirdi : साई मंदिरातील फुल-हार बंदी उठवली

कसे असेल वेळापत्रक?

मुंबईसाठी उड्डाण वेळापत्रक

  • सोलापूरहून मुंबईला जाण्यासाठी सकाळी ९ वाजून ४० मिनिटांनी विमान उडणार असून ते मुंबईत १० वाजून ४० मिनिटांनी पोहोचेल.
  • तसेच मुंबईहून सोलापूरसाठी विमान दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी उडणार असून सोलापूरला ते दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी पोहोचेल.

गोवासाठी उड्डाण वेळापत्रक

  • सोलापूरहून गोवा येथे जाण्यासाठी दुपारी २ वाजून १५ मिनिटांनी विमान उड्डाण करेल व दुपारी ३ वाजून १५ मिनिटांनी गोव्यात पोहोचणार.
  • तर गोवा येथून सोलापूरला सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी विमान उडणार असून ते सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी सोलापूरात पोहोचेल. (Solapur Airport)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -