
सोलापूर : सोलापूरकरांचे बहुप्रतीक्षित विमानतळ (Solapur Airport) प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. लवकरच सोलापूर विमानतळाहून उड्डाण होणार आहे. यामध्ये मुंबई-गोवा (Mumbai-Goa) शहरांसाठी थेट उड्डाणांचा समावेश असणार आहे. (Solapur Airlines) त्यामुळे सोलापूरकरांचा मुंबई-गोवा प्रवास अवघ्या काही तासात पार पडणार आहे. होटगी रोड सोलापूर विमानतळावरून फ्लाय ९१ एअरलाईन्सची विमानसेवा २० डिसेंबर २०२४ पासून सुरु होणार आहे, अशी माहिती सोलापूर विकास मंचचे सदस्य विजय जाधव यांनी दिली.

मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वपुर्ण निर्णय मंत्री विखे पाटील यांच्या पाठपुराव्याला यश शिर्डी : कोविड संकट काळात शिर्डीतील (Shirdi) साई मंदिरात (Sai temple) फुले ...
कसे असेल वेळापत्रक?
मुंबईसाठी उड्डाण वेळापत्रक
- सोलापूरहून मुंबईला जाण्यासाठी सकाळी ९ वाजून ४० मिनिटांनी विमान उडणार असून ते मुंबईत १० वाजून ४० मिनिटांनी पोहोचेल.
- तसेच मुंबईहून सोलापूरसाठी विमान दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी उडणार असून सोलापूरला ते दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी पोहोचेल.
गोवासाठी उड्डाण वेळापत्रक
- सोलापूरहून गोवा येथे जाण्यासाठी दुपारी २ वाजून १५ मिनिटांनी विमान उड्डाण करेल व दुपारी ३ वाजून १५ मिनिटांनी गोव्यात पोहोचणार.
- तर गोवा येथून सोलापूरला सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी विमान उडणार असून ते सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी सोलापूरात पोहोचेल. (Solapur Airport)