जोहान्सबर्ग: भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात धावांचा डोंगर उभा केला आहे. संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांच्या शानदार शतकांच्या जोरांवर भारताने आफ्रिकेविरुद्ध पहिल्यांदा फलंदाजी करताना तब्बल २८३ धावा केल्या.
संपूर्ण २० षटकांच्या खेळादरम्यान आफ्रिकेला केवळ भारताचा एकच गडी बाद करता आला. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा दोन्ही सलामीसाठी आले होते. मात्र अभिषेक शर्माला ३६ धावाच करता आल्या. त्यानंतर तिलक वर्मा आणि संजू सॅमसन यांनी जबरदस्त खेळी करताना भारताला अडीचशे पार धावा करून दिल्या.
गेल्या दोन सामन्यात निराशाजनक खेळी केलेल्या संजू सॅमसनने या सामन्यात शानदार शतक ठोकले. त्याने ५६ बॉलमध्ये ६ चौकार आणि ९ षटकार ठोकत १०९ धावांची नाबाद खेळी केली. त्यानंतर तिलक वर्माने नाबाद १२० धावा तडकावल्या. त्याने ४७ बॉलमध्ये ९ चौकार आणि १० षटकारांच्या मदतीने ही खेळी साकारली.
चार सामन्यांच्या भारतीय संघ सध्या २-१ने आघाडीवर आहे. त्यामुळे हा सामना जिंकत भारतीय संघ मालिका जिंकण्यांसाठी पुरेपूर प्रयत्न करेल.
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…