मुंबई : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने २० नोव्हेंबरला राज्यात मतदान होणार आहे. मात्र सध्या १७ नंबर फॉर्म भरून मतदान करण्याबाबत ‘फेक मेसेज’ (Fake message) सगळीकडे फिरत आहेत. याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनीही अशा प्रकारची कोणतीही प्रक्रिया मतदान केंद्रावर होणार नाही, असे सांगितले.
ज्या मतदारांचे यादीतून नाव डिलीट असा शिक्का लागला असेल तर ते लोक किंवा व्यक्ती मतदान केंद्रावर फॉर्म नं. १७ भरून आणि आपले मतदानकार्ड किंवा आधारकार्ड दाखवून मतदान करू शकणार आहेत. ज्यांची नावे यादीत दिसत नाहीत, त्यांनी मतदान केंद्रावर येऊन वरील फॉर्म भरावा आणि मतदानाचा हक्क बजावावा, असा ‘मेसेज’ सोशल मीडियावर फिरत आहे.
मात्र हा मेसेज फेक (Fake message) असून, अशा प्रकारची कोणतीही प्रक्रिया मतदान केंद्रावर होणार नसल्याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.