मुंबई : ईसीआयने केवळ मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठीच नव्हे तर मतदान केंद्रांवर उपस्थित राहण्यास सक्षम नसलेल्या ज्येष्ठ नागरिक आणि अपंग व्यक्तींना लोकशाहीचा हक्क बजावता यावा यासाठी घरोघरी मतदान हा उपक्रम सुरू केला असून यामध्ये माटुंग्यातील अखिल कुंज सोसायटीतील ९४ वर्षाच्या हेमतीनी भाटियांनी घरबसल्या मतदान केले.
तर पद्मश्री विजेत्या ८२ वर्षीय कल्याण सुंदरम यांनी देखील घरबसल्या मतदान केले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस अगोदर, भारतीय निवडणूक आयोगाने मुंबईसह राज्यभरात घरोघरी मतदान करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.
Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीमुळे शाळा- महाविद्यालयांना तीन दिवस सुट्टी!
१२डी फॉर्म सादर केलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सुविधा उपलब्ध आहे. ईसीआय ने केवळ मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठीच नव्हे तर मतदान केंद्रांवर उपस्थित राहण्यास सक्षम नसलेल्या ज्येष्ठ नागरिक आणि अपंग व्यक्तींना लोकशाहीचा हक्क बजावता यावा यासाठी हा उपक्रम सुरू केला.