तिलक वर्मा : तिलक वर्माने वेस्ट इंडिजविरोधातील टी २० मालिकेत दमदार कामगिरी केली होती. लितक वर्मा याने दणक्यात पदार्पण करत टीम इंडियातील जागा निश्चित केली आहे. स्विंग गोलंदाजीसमोर तिलक कशी फलंदाजी करतो, याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या.
मुंबई: तिलक वर्मा(Tilak Varma) १३ नोव्हेंबरला सेंच्युरियन येथील टी-२०मध्ये वेगळ्याच रंगात होता. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात जबरदस्त शतक ठोकले होते. यानंतर जो जल्लोष झाला तो पाहण्यालायक होता.
तिलकने सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्कमध्ये ५१ बॉलमध्ये शतक ठोकले. भारताने २० षटकांत ६ बाद २१९ धावा केल्या. या शतकासह त्याने एक महारेकॉर्डही आपल्या नावे केला आहे. तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक ठोकणारा सगळ्यात तरूण खेळाडू ठरला आहे. त्याने सुरेश रैनाने केलेला १४ वर्षांचा जुना रेकॉर्ड उद्ध्वस्त केला. तेव्हा रैना २३ वर्षे १५६ दिवस इतक्या वयाचा होता.
तर २२ वर्षीय तिलक वर्मा यशस्वी जायसवालनंतर टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये शतक ठोकणारा दुसरा तरूण खेळाडू ठरला आहे. या स्टार फलंदाजाने या फॉरमॅटमध्ये आपल्या १९व्या सामन्यात पहिले शतक ठोकले.
तिलक वर्माने(Tilak Varma) १०७ धावांवर नाबाद राहताना आठ चौकार आणि सात षटकार ठोकले. एकूण मिळून तिलकच्या फलंदाजीमध्ये मॅच्युरिटी दिसली. तिलकशिवाय अभिषेक शर्माने भारताकडून या सामन्यात २५ बॉलमध्ये ५० धावांची तुफानी खेळी केली.
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…
किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…