मुंबई : चार दिवसांपूर्वी गोराई (Gorai) येथे एका माणसाचा मृतदेह सात तुकडे केलेल्या अवस्थेत आढळून आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. (Murder Case) हात-पाय, धड, डोकं अशा अवयवांचे तुकडे करुन सात डब्यांमधून एका गोणीमध्ये भरुन झुडुपांमध्ये ही गोणी भिरकावण्यात आली होती. याप्रकरणी गोराई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून या हत्येचे गूढ उकलले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोराई येथील मृत व्यक्तीचे नाव रघुनंदन पासवान असून त्याचे आंतरधर्मीय प्रेमसंबंधांतून ही हत्या झाली असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीस अटक केली आहे. मृत रघुनंदन मूळचा बिहारचा रहिवासी असून पुण्यात मजुरी करतो. भाईंदरमधील एका अल्पवयीन मुलीसोबत त्याचे प्रेमसंबंध होते. ते मुलीच्या कुटुंबाला मान्य नव्हते. त्यातूनच ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे.
Assembly Election 2024 : जोगेश्वरीत उबाठा उमेदवार अनंत (बाळा) नर कडून गुंडगिरी, महिलांचा विनयभंग
दारू पाजून नशेत केली हत्या
रघुनंदन हा गेल्या आठ महिन्यांपासून पुण्याच्या एका कंपनीत काम करत होता. दिवाळीच्या सुट्टीत तो घरी गेला मात्र ३१ ऑक्टोबर रोजी तो मित्रांसोबत मुंबईला जात असल्याचे सांगून तो घरातून निघाला. मुंबईला आल्यानंतर रघुनंदनने दारूच्या नशेत भाईंदरमध्ये राहणारा प्रेयसीचा भाऊ मोहम्मद सत्तार याला फोन केला. मोहम्मदने त्याला स्वतःकडे बोलावून दारू पाजली व नशेत त्याची हत्या केली. त्यानंतर आरोपीने मृतदेहाचे तुकडेकरुन हत्येच्या दुसऱ्या दिवशी ते तुकडे प्लास्टिकच्या डब्यात भरून तो डबा गोराईतील झुडुपात फेकून दिला.
दरम्यान, या गुन्ह्यात अटक आरोपीचा सहभाग असल्याचे तपासात समोर येत असून रिक्षाचालकाला याबाबत काही माहिती नसल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त होत आहे. (Mumbai Crime)
टॅटूमुळे पटली मृतदेहाची ओळख
मृत रघुनंदनचे वडील जितेंद्र पासवान यांनी मुलाच्या उजव्या हाताच्या टॅटूवरून त्याची ओळख पटवली. त्यावर ‘आरए अशी इंग्रजी अक्षरे लिहिली होती. रघुनंदनचे ज्या मुलीशी प्रेम होते, तिचे नाव ‘ए’ अक्षरावरून सुरू होते. (Gorai Murder Case)