PM Narendra Modi : “काँग्रेसने गरिबांना लुटलं! आणि आता…”, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर घणाघात

नवी मुंबई : महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. आता येणाऱ्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी मतदान होणार आहे, तर २३ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. अवघ्या देशाचं लक्ष या निवडणुकीकडे लागलेलं आहे. सध्या राज्यात सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. दिल्लीतील दिग्गज नेत्यांनी प्रचारासाठी देखील महाराष्ट्रात तळ ठोकला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्याही सभा विविध मतदारसंघात पार पडत आहेत. आज नवी मुंबईत पंतप्रधान मोदी यांची सभा पार पडली. या सभेत बोलताना मोदींनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर चांगलीच घणाघाती टीका केली आहे. ‘काँग्रेसने गरिबी हटावचा खोटा नारा दिला गरिबांना लुटण्याचं काम केलं’, असा हल्लाबोल मोदींनी केला.



पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?


“महाराष्ट्राचं सरकार महिलांना डबल लाभ देत आहे. सरकार लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मदत करत आहे. मात्र, हे महाविकास आघाडी वाले या योजनेच्या विरोधात न्यायालयात गेले होते. त्यामुळे त्यांचा उद्देश काय आहे? हे तुम्ही ओळखा. यावेळी महाविकास आघाडीला संधी देऊ नका. महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता नाही. अनेक राज्यात आणि महाराष्ट्रात सत्ता नाही. त्यामुळे आता ते सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. द्वेशाचं विष पेरण्याचं काम काँग्रेसवाले करत आहेत. काँग्रेसची मानसिकता ही दलित आदिवासी कमजोर व्हावे, ओबीसी कमजोर व्हावेत, अशी मानसिकता त्यांची आहे. या समाजाला वेगळं करून सत्तेत येण्याची धडपड आणि जातीच्या आधारावर वाद लावण्याचा काँग्रेसचं षडयंत्र आहे. त्यामुळे ‘हम एक है तो सेफ है!”, असं म्हणत मोदींनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.





“तुमचं सर्वांचं भवितव्य हे महायुतीच्या हातात सुरक्षित आहे. त्यामुळे महायुतीचं सरकार महाराष्ट्रात हंव. आमच्या सरकारने गेल्या १० वर्षांत २५ कोटी लोकांना गरीबीमधून बाहेर काढलं. ४ कोटी लोकांना पक्की घरे दिली. सर्वात जास्त लाभार्थी सर्वसामान्य लोक आहेत. याआधीही अशा प्रकारचं काम होऊ शकलं असतं. मात्र, काँग्रेसची ही मानसिकता नाही. आजही काँग्रेस गरिबांसाठी सरु केलेल्या योजनेला विरोध करण्यात काम करतं. आम्ही देशातील ८० कोटी लोकांना मोफत राशन देत आहोत. मात्र, काँग्रेस यालाही विरोध करतं. काँग्रेसने गरिबी हटावचा खोटा नारा दिला”, असा हल्लाबोल मोदींनी विरोधकांवर केला.


Comments
Add Comment

Sudhir Mungantiwar : आधी घरचा आहेर, मग 'वर्षा'वर खलबतं! मुनगंटीवार-फडणवीस भेटीत नेमकं काय शिजलं?

चंद्रपूरच्या पराभवानंतर मुनगंटीवारांचे 'बंड' की समन्वय? मुंबई : राज्यात महायुतीचा विजयाचा वारू उधळत असताना

गुटखाबंदीची कठोर अंमलबजावणी; अधिकाऱ्यांना निलंबनाचा इशारा

मुंबई : राज्यात बंदी असलेल्या गुटखा व तत्सम प्रतिबंधित अन्नपदार्थांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा अन्न व औषध

राज्यातील ३० लाख लाडक्या बहिणींची 'ई-केवायसी'कडे पाठ

३१ डिसेंबरची डेडलाईन; प्रक्रिया पूर्ण न केल्यास लाभ कायमचा बंद मुंबई : महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना

भारताने अल्प किंवा दीर्घकालीन युद्धासाठी तयार राहावे: तिन्ही संरक्षण दलांचे प्रमुख जनरल अनिल चौहान

मुंबई : दहशतवाद रोखण्यासाठी आणि शेजारी राष्ट्रांबरोबर असलेल्या प्रादेशिक वादाच्या पार्श्वभूमीवर भारताने उच्च

काँग्रेसचे माजी नगरसेवक धर्मेश व्यासही भाजपात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : काँग्रेसचे माजी नगरसेवक धर्मेश व्यास यांनीही अखेर भाजपच्या झेंडा हाती घेतला. धर्मेश

बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘आरोग्य आपल्या दारी’ उपक्रम राबवणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवक व नगराध्यक्षांचा सत्कार मुंबई : “मुख्यमंत्रीपदी