Monday, December 9, 2024
Homeब्रेकिंग न्यूजAmbulance Cylinder Explosion : रुग्णवाहिका अमित शाहांच्या ताफ्यात! संध्याकाळी बाळंतीणीला नेताना रुग्णवाहिकेत...

Ambulance Cylinder Explosion : रुग्णवाहिका अमित शाहांच्या ताफ्यात! संध्याकाळी बाळंतीणीला नेताना रुग्णवाहिकेत स्फोट

जळगाव : जळगावमध्ये धावत्या रुग्णवाहिकेला अचानक आग लागून रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट (Ambulance Cylinder Explosion) झाल्याची धक्कादायक घटना घडली. जळगावच्या राष्ट्रीय महामार्गावर गुजरात पेट्रोल पंपाजवळ ही भीषण घटना घडली आहे. रुग्णवाहिका या स्फोटामध्ये पूर्णपणे जळून खाक झाली आहे. हा स्फोट इतका भीषण होता की, आजूबाजूला स्फोटाच्या आवाजाने असलेली एटीएम तसेच काही घरांच्या काचासुद्धा फुटल्या, अशी माहिती प्रत्यक्षदर्शंनी दिली आहे. या दुर्घटनेमध्ये रुग्णवाहिकेचा चालक सुदैवाने बचावला आहे.

रुग्णवाहिकेला आग लागल्याचं चालकाच्या लक्षात आल्यानंतर तो तात्काळ रुग्णवाहिकेतून खाली उतरला. त्यामुळे त्याला कुठलीही दुखापत झालेली नाही. रुग्णवाहिकेला अचानक आग लागली. ती आग सगळीकडे पसरली आणि त्यामुळे रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे या रुग्णवाहिकेत एक प्रसूती झालेली महिला होती. समयसूचकता चालकाने राखत महिलेला आणि तिच्या बाळाला देखील खाली उतरवलं. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

नेमकं काय घडलं?

धरणाव इथून गरोदर महिलेला घेऊन येणाऱ्या १०८ या रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट झाला. त्यात वाहनाच्या चिंधड्या होऊन त्याचे अवशेष १५० फूट उंच उडाले. तर तब्बल ५०० मीटर अंतरापर्यंत या स्फोटाचे हादरे बसले. रुग्णवाहिकेतील रुग्ण, त्याचे नातेवाईक आणि डॉक्टरचे चालकाच्या समयसूचकतेमुळे प्राण वाचले आहेत. अग्निशमन दलाच्या दोन बंबाद्वारे ही आग विझविण्यात आली. काल रात्री ९. ३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. एमएच १४ सीएल ०७९६ ही १०८ रुग्णवाहिका गरोदर महिलेला घेऊन रुग्णालयात येत असताना महामार्गावर आगीची ठिणगी उडाली. चालक राहूल बाविस्कर याने वाहनातील नागरिकांना खाली उतरवलं. हे वाहन पुढे जात असल्यास रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट झाला. वाहनाच्या चिंधड्या उडाल्या. आगीच्या ज्वाला आणि सिलिंडर १५० फूट उंचापर्यंत उडाले. फुटलेले सिलिंडर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला तर रिकामे असलेले सिलिंडर वाहनाजवळ उडाले. घटनेचा धक्का बसल्याने चालकाला बराच वेळ काहीच उमजलं नाही.

रुग्णवाहिका अमित शाहांच्या ताफ्यात होती

काल ज्या रुग्णवाहिकेचा स्फोट झाला ती दुपारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या ताफ्यात होती. अशी माहिती १०९चे व्यवस्थापक राहुल जैन यांनी दिली. सुदैवाने त्यावेळी काही घटना घडली नाही. एक सिलिंडर ऑक्सिजनने भरलेले होते तर दुसरे रिकामे होते. भरलेल्या सिलिंडरचे स्फोटामुळे (Ambulance Cylinder Explosion) तुकडे होऊन खाक झाले आहेत.

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर; शिवाजी पार्कवर मोदींचा ‘नाद’ घुमणार

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -